मुंबईः राज्यसभेला (Rajyasabha) भाजपकडून तिसरा उमेदवार देण्यात आल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. तिसऱ्या उमेदवार भाजपकडून जाहीर झाल्यानंतर मात्र महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) राजकीय सूत्रं हालवण्यास सुरुवात केली. आज ट्रायडंट हॉटेल महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून मार्गदर्शन करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली त्यावेळी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच वरिष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Khargr) बैठकीसाठी ट्रायडंटमध्ये आले त्यावेळी प्रत्येक हालचालीकडे माध्यमांनी लक्ष ठेवले होते.
मल्लिकार्जून खर्गे हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या जवळचा नेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. आज ते मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीसाठी आले. त्यावेळी हॉटेलमध्ये खर्गे यांनी प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडून खर्गेंचं मान झुकून स्वागत करण्यात आले.
अरविंद सावंत यांनी त्यांचे मान झुकवून स्वागत केले आणि त्यांचे हेच स्वागत चर्चेचा विषय झाले. मल्लिकार्जून खर्गे यांची काँग्रेसकडून वरिष्ठ निरीक्षक म्हणून या निवडणुकीसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे घटक पक्ष आहेत. तिन्ही पक्ष मिळून त्यांनी हे सरकार स्थापन करण्यात आले असले तरी, त्यांच्या या एकीवर मात्र भाजपकडून टीका करण्याची संधी सोडण्यात येत नाही. राणे बंधूंनी तर बाळासाहेब ठाकरे यांचा संदर्भ मुख्यमंत्र्यांवर प्रचंड टीका केली जाते. आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मान झुकवून स्वागत केले गेल्याने विरोधकांच्या हातात मात्र हे आयते कोलीतच मिळाले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली होती, जो पर्यंत दिल्ली हायकमांडचा आदेश येत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणताही निर्णय घेत नाहीत असा टोला लगावला होता. आता मान झुकवून अरविंद सावंत यांनी मल्लिकार्जून खर्गे यांचे स्वागत केल्यानंतर आता विरोधक यावर काय मत व्यक्त करणार ते आता पाहावेच लागेल.