सुनील जाधव, Tv9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : सत्ताधारी पक्ष लोकशाहीच्या मुळावर उठल्याची टीका शिवसेनेचे (Shiv Sena) ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केली. निवडणूक आयोगाच्या विरोधात उच्च न्यायालयाच गेलो असल्याचंही त्यांनी सांगितलं. अरविंद सावंत म्हणाले, पक्षांतर बंदी कायदा काय आला. घोडेबाजार होऊ नये म्हणून हा कायदा आला. दोन-तृतांशची अट घालण्यात आली. संबंधितांना कुठंतरी मर्ज व्हावं लागेल, असं ठरलं. तो विलीनिकरणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. पण, गेलेत ना तिकडं. जनाची नाही तर मनाची राहिली असती. असा टोला अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला लगावला.
अऱविंद सावंत म्हणाले, हे सगळं कारस्थान भाजपची महाशक्ती करते. त्यांच्या इशाऱ्यावर नाचलं जातंय. कालपर्यंत चार संस्था होत्या. आता पाचवी आली. सत्ताधारी पक्षाच्या या संस्था वेठबिगार झाल्यात. ईडी, सीबीआय,इंकम टॅक्स, नार्कोटिक्स,आता निवडणूक आयोग हे सर्व केंद्राच्या इशाऱ्यावर नाचतात. लोकशाहीच्या मुळावर घाव घालण्याचं काम केलं जातंय, असा आरोपही अरविंद सावंत यांनी केला.
म्हणून आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलोत. आम्ही जे सिम्बॉल दिलेत. तेच शिंदे गटानं मागितले. मग मला सांगा निवडणूक आयोग किती बायस आहे. आम्ही तुम्हाला कळवंल. मग तुम्ही लिक का केलंत. आम्ही काही केलं की, त्याला आडवं जायचं. एवढच त्यांनी ठरवलंय. हा सर्व खेळखंडोबा निवडणूक आयोगानं मांडलाय.
त्यांनी सादर केलेली नोटरी बघा. त्यांच्यावर किती गुन्हे आहेत तेही बघा. कशा खोट्या पद्धतीनं गेलेत तेही तुम्हाला कळेल. ही कुठली पद्धत आहे, असा सनसणीत टोला त्यांनी लगावला.