Aryan Khan Drug Case Video: त्या दिवशीही तो आईच्या संपर्कात नव्हता आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही, प्रभाकर साईलच्या आईची ह्रदयद्रावकस्थिती

| Updated on: Apr 02, 2022 | 7:18 PM

प्रभाकर साईलच्या मृत्यूनंतर अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत. मात्र, आता माझा मुलगा गेला आता कसल्या चौकशा करता? असा सवाल प्रभाकरच्या आईने केलाय.

Aryan Khan Drug Case Video: त्या दिवशीही तो आईच्या संपर्कात नव्हता आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही, प्रभाकर साईलच्या आईची ह्रदयद्रावकस्थिती
प्रभाकर साईलच्या आईची प्रतिक्रिया
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पंच साक्षीदार प्रभाकर साईलचा (Prabhakar Sail) मृत्यू झालाय. साईलचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी प्रभाकर साईल याचं निधन झालं. हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्यामुळे साईलचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला  (Aryan Khan) सोडण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप प्रभाकर साईलकडून करण्यात आला होता. दरम्यान, प्रभाकर साईलच्या मृत्यूनंतर अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत. मात्र, आता माझा मुलगा गेला आता कसल्या चौकशा करता? असा सवाल प्रभाकरच्या आईने केलाय.

प्रभाकरच्या आईने 4 महिन्यांपूर्वी दिलेली प्रतिक्रिया

प्रभाकरबद्दल मी काय सांगणार? आम्हाला माहिती नाही कुठे राहतो तो. चार महिने झाले काही कॉन्टॅक्ट नाही. कधी एक फोन नाही. आम्हाला पाच पैसे देणं नाही घेणं नाही. इथून कपडे लत्ते सगळं घेऊन गेला. आमच्याकडे आता त्याचं काहीच नाही. तो बॉडीगार्डचं काम करतो. प्रभाकरने जे काही खुलासे केले होते त्याची काहीच माहिती नाही. प्रभाकरचं लग्न झालं, त्याला दोन पोरी आहेत, अशी प्रतिक्रिया प्रभाकरच्या आईने चार महिन्यांपूर्वी म्हणजे ड्रग्ज प्रकरणाशी त्याचा संबंध आल्यानंतर दिली होती.

‘मुलगा तर गेला आत्ता काय बोलायचं?’

प्रभाकर साईचा मृत्यू झाल्यानंतर आज प्रभाकरच्या आईच्या भावना जाणून घेतल्या. त्यावेळी त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. प्रभाकरशी आपलं बोलणं झालं होतं, पण अचानक काय झालं ते समजण्यापलीकडचं आहे. तो एकटाच राहत होता, एक दिवसापूर्वी संवाद झाला होता, त्यावेळी तो ठिक होता. मात्र अचानक काय झाले माहीत नाही. काल त्यांची तब्येत ठीक नसल्याचा फोन आला आणि तयांचे निधन झालं. इतर चौकशीबाबतही काहीच माहीती नाही. त्याला दोन मुली आहेत, त्यांचं कसं होणार माझा मुलगा तर गेला आत्ता काय बोलायचं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

प्रभाकर साईलचे खळबळजनक आरोप काय होते?

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ज्या ड्रग्ज केसमध्ये सापडला आहे. त्याच केसमध्ये प्रभाकर साईल पंच असल्याने त्यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून त्याच नाव सतत चर्चेत होतं. आर्यन खानला सोडण्यासाठी शाहरुख खानकडे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप प्रभाकर साईलने केला होता. आरोप झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये नेहमी चर्चेत राहिलेले तत्कालीन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचाही समावेश होता. कुणी किती पैसे मागितले याची आकडेवारीही प्रभाकर साईलन यांनी सांगितली होती. त्यामुळे या आरोपानंतर खळबळ माजली होती.

इतर बातम्या :

Ajit Pawar: पोलिसांनो, सुटलेली पोटं कमी करा, आर्मीतल्या जवानांसारखा फिटनेस ठेवा; अजितदादांचं आवाहन

Mumbai Metro 2A, metro 7 : मुख्यमंत्र्यांनी दाखवला मेट्रोला हिरवा झेंडा, पहिलं तिकीट काढून प्रवासही केला