सचिन वाझे आणि नालेसफाईच्या कनेक्शनची चौकशी करा; आशिष शेलार यांची मागणी

| Updated on: Jun 07, 2021 | 2:32 PM

निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेवर नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदारांकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी होती. (ashish shelar attacks shiv sena over nullah cleaning in mumbai)

सचिन वाझे आणि नालेसफाईच्या कनेक्शनची चौकशी करा; आशिष शेलार यांची मागणी
ashish shelar
Follow us on

मुंबई: निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेवर नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदारांकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी होती. त्यामुळे वाझे आणि नालेसफाईच्या कामाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. (ashish shelar attacks shiv sena over nullah cleaning in mumbai)

आशिष शेलार यांनी आज मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ही मागणी केली. सचिन वाझेला पालिकेच्या कंत्राटदारांकडून वसुली करण्यास सांगण्यात आले होते. तशी माहिती कोर्टाच्या रेकॉर्डवर आली आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामाची आणि वाझेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

नालेसफाईचा दावा खोटा

मुंबई महापालिकेची मान्सूनपूर्व तयारी पूर्णपणे झालेली नाही. नालेसफाईचे काम 100% पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा खोटा आहे. नालेसफाई करून दाखवण्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेला या जबाबदारीतून हात झटकता येणार नाही. 70 कोटी रुपये नालेसफाईसाठी खर्च केलेल्या महापालिकेला त्याचा हिशोब द्यावा लागेल, असं सांगतानाच शिवसेनेनं नाल्यावर शेती करण्याची नवीन योजना सुरू केल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

गाळ कुठे टाकला? फोटो दाखवा

दरम्यान यापूर्वी शेलार यांनी नालेसफाईवरून पालिकेवर टीका केली होती. 70 कोटी खर्च करुन केलेली नालेसफाई संपूर्ण आभासी आहे. विषय दाव्याचा नाही आश्वासन दिलं त्याचा आहे, मुंबईकरांना शब्द दिला होता, मुंबई तुंबू देणार नाही. आता बचाव करू नका, पळून जाऊ नका. 5 लाख मॅट्रिक टन गाळ काढला म्हणता, मिठी नदीचा जरी गाळ पकडला तरी तो टाकला कुठे?, असा सवाल त्यांनी केला होता. ते सरकारी डम्पिंग ग्राऊंड असेल तर गाळ टाकल्याचा फोटो दाखवा, खासगी असेल तर सीसीटीव्ही दाखवा, गाळ कुठे मोजला त्या वजन काट्याच्या पावत्या दाखवा, असं आव्हान देतानाच नालेसफाईत सुद्धा कट कमिशन सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. (ashish shelar attacks shiv sena over nullah cleaning in mumbai)

 

संबंधित बातम्या:

मुलीला वाचवण्यासाठी चार तरुणांच्या बंधाऱ्यात उड्या, एकाचा मृत्यू, मुलगी सुखरुप

Maharashtra Coronavirus LIVE Update : आजपासून पुणे अनलॉक, शहरातील पीएमपी बससेवा आजपासून 50 टक्के क्षमतेने सुरु

Maharashtra News LIVE Update | आंदोलनाच्या भविष्यातील रणनीतीबाबत चर्चा – विखे पाटील

(ashish shelar attacks shiv sena over nullah cleaning in mumbai)