मुंबई : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील जनतेला वारंवार विनंती करत आहेत. जनतेने बाहेर पडू नये, नियम पाळावेत (Corona cases and lockdown) असे ते सांगत आहेत. मात्र, कोणाही ऐकत नाहीये. अशीच परिस्थिती राहिली तर राज्यात सध्या जे नियम रात्री लावलेले आहेत, ते सकाळी लावावे लागतीत,” असे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) म्हणाले. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच राज्य सरकार लॉकडाऊन लागू करु शकतं, अशी चर्चासुद्धा आहे. या पार्श्वभूमीवर अस्लम शेख यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व आले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. (Aslam Shaikh statement on Corona cases and lockdown in Mumbai)
यावेळी बोलताना अस्लम शेख यांनी मुंबईतील कोरोना परिस्थीतीवर चर्चा केली. त्यांनी मुंबईमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुबलक खाटा आहेत, असे सांगितले. तसेच मुंबईत रुग्णांवर उपचारासाठी 80 टक्के खासगी रुग्णालयात व्यवस्था केली आहे. लोकांना त्यांचे उद्योग सांभाळायचे आहेत. तसेच त्यांना त्यांचा जीवसुद्धा वाचवायचा आहे. झोपडपट्टी भागापेक्षा मोठ मोठ्या इमारतींमध्ये कोरोनाची रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, असेही ते म्हणाले.
मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच संकेत मुख्यमंत्री उद्योग ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. याविषयी शेख यांनी अधिकचं स्पष्टीकरण दिलं आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी नियोजन कसं करायचं याबद्दल एक टास्क फोर्स काम करत आहे. राज्यात तसेच मुंबईत लॉकडाऊ हवा की नको हे लोकांच्या हातात आहे. लोकांनी नियम पाळले तर लॉकडाऊन लागू होणार नाही, असे अस्लम शेख म्हणाले.
यावेळी पुढे बोलताना त्यांनी कोरोना माहामारीबद्दल भाजपच्या भूमिकेवर बोट ठेवून ठेवलंय. त्यांनी भाजप नुसतं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. किराना दुकानं, मॉल्स, रेल्वे अशा ठिकाणी लोकांची जास्त प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे या ठिकाणी सकाळी गर्दी होऊ नये साठी काय व्यवस्था करावी याविषयी नियोजन सुरू आहे. देशात जेव्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला तेव्हा राज्याने स्थलांतरितांना मोठी मदत केली. पुन्हा जम्बो सेंटर सुरु करता येतील. कोरोनाला थोपवण्यासाठी सगळ्यांनी मिळूनच काळजी घेतली पाहिजे. भाजप यावर नुसतं राजकारण करत आहे. हा प्रश्न राजकीय नाहीये, अशी टीका अस्लम शेख यांनी भाजपवर केली.
दरम्यान, राज्यात तसेच मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात स्थिती नाजूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अस्लम शेख यांनी केलेलं लॉकडाऊनचा निर्णय लोकांच्या हातात आहे; या वक्तव्याला महत्त्व आले आहे.
इतर बातम्या :
(Aslam Shaikh statement on Corona cases and lockdown in Mumbai)