मोठी बातमी : मुंबईतील पवईत नाकाबंदीमध्ये एटीएम कॅश व्हॅनमधील 4 कोटी 70 लाखांची रोकड जप्त

| Updated on: May 08, 2024 | 5:08 PM

मुंबई पोलिसांनी निवडणुकांदरम्यान नाकाबंदीवेळी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी पवईमध्ये एटीएम कॅश व्हॅन पकडली असून त्यामध्ये कोटींची रोकड जप्त केली आहे.

मोठी बातमी : मुंबईतील पवईत नाकाबंदीमध्ये एटीएम कॅश व्हॅनमधील 4 कोटी  70 लाखांची रोकड जप्त
Follow us on

लोकसभा निवडणुकीचं मतदान होत असताना मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई केली असून एटीएम कॅश व्हॅन पकडली. कॅश व्हॅन गाडी मधून 4 कोटी 70 लाख रुपया घेऊन जात असताना पोलिसांनी जप्त केली आहे. सोमवारी रात्री पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीजवळ पवई पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली होती.

या नाकाबंदीमध्ये कॅश व्हॅन गाडी जात असताना पवई पोलिसांनी गाडीला थांबून चौकशी केली असता पवई पोलिसांनी 4 कोटी 70 लाख रुपये कॅश व्हॅन मधून जप्त केली आहे. पवई पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक कार्यालयात याची माहिती दिल्यानंतर निवडणूक अधिकारी त्या कॅशच्या बारकोड स्कॅन केल्यानंतर बारकोड मिस मॅच झाला. यानंतर आयकर विभागाने या कॅश आणि गाडी ला आपल्या ताब्यात घेऊन हा रोकड कुठून आला आणि एटीएममध्ये भरण्यासाठी घेऊन जात होते की निवडणुकीमध्ये या रोकडचा वापर केला जाणार होता का? या संदर्भात अधिक तपास आयकर विभाग करत आहेत.

लोकसभा निवडणुक सुरु असल्यामुळे पैशांचं वाटप होऊ नये यासाठी सर्व राज्यात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्येही पोलिसांचा मोठा फौजफाटा आपल्याला दिसेल. खासकरून रात्रीच्यावेळी पोलीस कडा पहारा देत आहेत.