मुंबई : आज या ठिकाणी पवनपुत्र हनुमान, रामाचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या शांतीसाठी महाराष्ट्राला लागलेला शनी दूर करण्याच प्रयत्न करत आहोत. शनिवारच्या दिवशी मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा आम्ही वाचणार आहोत, असं आमदार रवी राणा (Ravi Rana) म्हणाले. शनिवार हा मारुतीराया दिवस. याच दिवशी हा शनी महाराष्ट्राला लागला. संपूर्ण महाराष्ट्रात उन्नती झाली पाहिजे. शांती नांदली पाहिजे हा आमचा हेतू आहे. त्याला हा विरोध होतोय. मला थांबवण्याचा प्रयत्न होतोय. मुख्यमंत्री (CM) सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. हे बाळासाहेबांच्या (Balasaheb) विचाराचे शिवसैनिक नाहीत. पोलीस आम्हाला दाखवत आहेत. शिवसैनिकांना आमच्या घराबाहेर आणून आमच्यावर दादागिरी करत आहेत, असा आरोप राणा दाम्पत्यानं केलाय.
राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना दिलेत. आम्हाला धमकावण्याचा आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय. भगवंताला प्रार्थना करतो. या सगळ्यांना बुद्धी येवो. बाळासाहेबांच्या विचारांवर या सगळ्यांनी चालावं असं मी आवाहन करतो. यांचं डोकं ठिकाणावर आलं पाहिजे. त्यासाठी आम्ही मातोश्रीवर जाणार. पठण करणार. पण पोलीस आम्हाला थांबवत आहेत, असा आरोप राणा दाम्पत्यानं लावलाय.
खासदार नवनीत राणा म्हणाल्या, नव वाजता मातोश्रीवर जाणार असल्याचं सांगितलं होतं. आम्ही निघणार होता. पण, पोलीस आमच्या दरवाड्यावर उभी आहे. आम्ही जिथं राहतो, तिथं दुसरे दहा कुटुंब राहतात. पोलीस इथं आल्यामुळं या सर्व कुटुंबीयांना त्रास होत आहे. कुणाच्या आदेशावर पोलीस इथं आलेत, असा सवाल नवनीत राणा यांनी विचारला.
मुख्यमंत्री गेल्या दोन-अडीच वर्षांपासून कामावर गेलेच नाहीत. मुख्यमंत्र्यांनी गेल्या दोन वर्षांत काम काहीच केलं नाही. पगार मात्र पूर्ण घेतला. एकही वेळ ते मंत्रालयात गेले नाहीत. पण, काल ते पूर्ण कटुंबीयांसह मातोश्रीवर आले. शिवसैनिकांसोबत बैठक घेतली. पदाधिकाऱ्यांना हल्ला करण्यासाठी तयार केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी लावला.
संबंधित बातम्या