मुंबई : ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ हा हॉलिवू़ड पट आतापर्यंतचा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यात जगभरात 14,060 कोटी रूपयांची कमाई केली होती. तर भारतात या चित्रपटाने 450 कोटींची कमाई केली आहे.
दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांच्या याच चित्रपटाच्या ‘अवतार’ या पहिल्या भागानेही जगभरात स्पेशल इफेक्टने पडद्यावर अनोखी दुनिया सादर करुन सर्वांची वाहवा मिळविली होती. आता दुसरा भाग समुद्री जलचरांच्या स्वरुपात सादर करीत बक्कळ म्हणजे 450 कोटींची कमाई केली आहे.
वास्तविक दुसऱ्या भागाच्या पटकथेत फारसा दम नसतानाही या चित्रपटाने सर्वाधिक देशातील सर्वाधिक कमाई करणारा हॉलीवू़डपट असा बहुमान मिळविला आहे. या चित्रपटाने तीन आठवड्यात तिकीटबारीवर एकूण 454 कोटींचे कलेक्शन मिळविले आहे.
ही कमाई तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘एव्हेंजर एंड गेम’ एकूण 440 कोटींचे कलेक्शन केले होते. या चित्रपटाच्या भारतीय भाषेच्या आवृत्तींनी इंग्रजीपेक्षा जादा कमाई केली आहे, खास करून हिंदी भाषेतील आवृत्तीला प्रेक्षकांचे जास्त प्रेम मिळाले आहे.
देशभरातील आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सर्व भाषेच्या चित्रपटात या चित्रपटाने आठवा क्रमांक पटकावला आहे. ‘एव्हेंजर एंड गेम’ ( एकूण कमाई 440 कोटी ) , ‘एव्हेंजर : इन्फीनिटी वॉर’ ( एकूण कमाई 269.50 कोटी ) , ‘स्पायडर-मॅन : नो वे होम’ ( एकूण कमाई 261.90 कोटी ) , ‘द जंगल बुक’ ( एकूण कमाई 259.30 कोटी ) , ‘द लायन किंग’ ( एकूण कमाई 184.70 कोटी ) , ‘डॉक्टर स्ट्रेज इन द मल्टीवर्स ऑफ मैडनेस’ ( एकूण कमाई 161 कोटी ) अशी आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या हॉलीवूडपटांची नावे आहेत.
‘अवतार द वे ऑफ वॉटर’ रिलीजच्या चौथ्या आठवड्यात दाखल झाला आहे. सोमवारी या चित्रपटाने शानदार 25 दिवस पूर्ण केले. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार या चित्रपटाने भारतात रिलीजच्या चौथ्या शुक्रवारी सुमारे 4 कोटी रुपये, चौथ्या शनिवारी 6.05 कोटी रुपये आणि चौथ्या रविवारी सुमारे 8.50 कोटी रुपये कमावले आहेत.
रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 193.60 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने तिकिटांच्या किमतीत घट होऊनही बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे.भारतात रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 40.30 कोटी रुपयांची दमदार ओपनिंग केली.
तिसऱ्या आठवड्यापर्यंत भारतात ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ चित्रपटाचे कलेक्शन 353.95 कोटींवर पोहोचले होते. या कालावधीत चित्रपटाने इंग्रजीमध्ये 187.23 कोटी रुपये, हिंदीमध्ये 116.13 कोटी रुपये, तेलगूमध्ये 27.27 कोटी रुपये आणि तामिळमध्ये 17.30 कोटी रुपये कमावले आहेत. चौथ्या वीकेंडपर्यंत या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने सर्वाधिक 120 कोटींची कमाई केली आहे.