रविवारी नवी मुंबईचा प्रवास टाळा, तीनही मार्गावर मेगा ब्लॉक

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई: लोकल रेल्वे मार्गावर रविवारी मध्य, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक तर पश्चिम रेल्वे मार्गावर जंबो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 40 मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक असेल. दरम्यान ठाणे स्थानकावरुन अप धीम्या मार्गावर सर्व लोकल वाहतूक मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. […]

रविवारी नवी मुंबईचा प्रवास टाळा, तीनही मार्गावर मेगा ब्लॉक
लोकल ट्रेन
Follow us on

मुंबई: लोकल रेल्वे मार्गावर रविवारी मध्य, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक तर पश्चिम रेल्वे मार्गावर जंबो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते दुपारी 3 वाजून 40 मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक असेल. दरम्यान ठाणे स्थानकावरुन अप धीम्या मार्गावर सर्व लोकल वाहतूक मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

तर हार्बर मार्गावर सकाळी 10 वाजून 34 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 8 मिनिटांपर्यंत सीएसएमटीवरुन पनवेल, बेलापूर, वाशी या स्थानकांसाठी एकही लोकल धावणार नाही. मात्र दरम्यानच्या काळात सीएसएमटी ते वाशी पनवेल स्थानकादरम्यान विशेष लोकल धावतील.

तिकडे पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली-भार्इंदर स्थानकांदरम्यान 4 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

अप आणि डाऊन जलद मार्गावर हा चार तासांचा जम्बो ब्लॉक असेल. बोरिवली ते भार्इंदर स्थानकांदरम्यान सिग्नलिंग, रेल्वे रुळ दुरुस्ती, ओव्हरहेड वायर दुरुस्ती यासाठी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल.

ब्लॉकदरम्यान सर्व अप जलद मार्गावरील लोकल अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. तर, विरार-वसई रोड ते बोरिवली सर्व डाऊन जलद लोकल या डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.