Baba Siddiqui Murder : लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलचं सूत्रधार?, या अ‍ॅपचा करत होता वापर, मुंबई पोलिसांचा धक्कादायक खुलासा

| Updated on: Oct 27, 2024 | 9:25 AM

Lawrence Bishnoi Brother Anmol : बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल आरोपींच्या थेट संपर्कात असल्याचे पोलिसांच्या तपासास पुढे आले आहे. त्यामुळे हे हत्याकांड लॉरेन्सच्या इशाऱ्यावरूनच घडल्याचे समोर येत आहे. अनमोल याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Baba Siddiqui Murder : लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलचं सूत्रधार?, या अ‍ॅपचा करत होता वापर, मुंबई पोलिसांचा धक्कादायक खुलासा
लॉरेन्सचे थेट कनेक्शन
Follow us on

बाबा सिद्दीकी हत्याकांड हे लॉरेन्स बिश्नोई गँगनेच घडवून आणल्याचा आणखी एक पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल आरोपींच्या थेट संपर्कात असल्याचे पोलिसांच्या तपासास पुढे आले आहे. त्यामुळे हे हत्याकांड लॉरेन्सच्या इशाऱ्यावरूनच घडल्याचे समोर येत आहे. मॅसेंजर अ‍ॅपचा वापर आरोपींशी संपर्क करण्यासाठी करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. अनमोल याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

असे लागले धागेदोरे हाती

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सुजीत सुशील सिंह याला पंजाबमधून अटक करण्यात आली होती. सिंह कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी अनमोल बिष्णोईला आरोपी करण्यात आले आहे. अनमोल बिष्णोईने यापूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार घडवून आणला होता. सिंह याच्या सांगण्यावरून या प्रकरणात अटक आरोपी नितीन सप्रे व राम कनोजिया यांनी बाबा सिद्दिकी यांचे घर आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाची पाहणी केल्याचे तपासात समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 32 वर्षीय सुजीत सिंह याला अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा

परदेशातील गुंड अनमोलच

सुजीत सुशील सिंह हा परदेशातील गुंडासोबत संपर्कात होता. सिंह विविध समाज माध्यमातून अनेक खात्यांवर संवाद साधत होता. तो परदेशातील गुंड अनमोल बिष्णोई असल्याचा संशय आहे. सुजीत सिंह मुंबईतील रहिवासी आहे आणि बाबा सिद्दिकीच्या हत्या प्रकरणात त्याचा शोध सुरू होता. पंजाब पोलीस व मुंबई पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत सिंहला लुधियानातून पकडण्यात आले होते. सिंह हा सुद्धा बाबा सिद्दिकी यांना मारण्याच्या कटात सहभागी होता. तो पूर्वी घाटकोपरच्या छेडा नगर परिसरात राहात होता आणि त्याला लुधियाना मध्ये अटक करण्यात आली होती. याप्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली. मुंबई, अकोला, पुणे, पंजाब, दिल्ली, हरयाणापर्यंत तपास करत काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.