Bachchu Kadu : मंत्र्याचे फोन टॅप करणं हा नालायकपणा, मला कुणाच्या क्लिनचीटची गरज नाही; फोन टॅपिंग प्रकरणात बच्चू कडू आक्रमक

| Updated on: Aug 18, 2022 | 9:50 AM

तस्करी करतो, असे सांगून फोन टॅप करण्यात आले होते. यावर आक्रमक भूमिका घेत बच्चू कडूंनी स्वत:चा बचाव केला आहे. अफू, गांजा तस्करीप्रकरणी संबंधित फोन टॅप करण्यात आले होते. माझ्या पीएचा फोन टॅप करण्यात आला होता, असे बच्चू कडू म्हणाले.

Bachchu Kadu : मंत्र्याचे फोन टॅप करणं हा नालायकपणा, मला कुणाच्या क्लिनचीटची गरज नाही; फोन टॅपिंग प्रकरणात बच्चू कडू आक्रमक
बच्चू कडू
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : मला कुणाच्या क्लिनचीटची गरज नाही, असे वक्तव्य आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केले आहे. फोन टॅपिंग प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही त्यांनी आपले मत मांडले. मी नाराज नाही. पुढील मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet expansion) आपला विचार केला जाणार असल्याचा शब्द दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर निष्ठा ही पक्षावर नाही, तर सामान्य नागरिक, जनतेवर असली पाहिजे, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. ते मुंबईत बोलत होते. राज्यात सध्या फोन टॅपिंगचे (Phone tapping) प्रकरणही चर्चेत आहे. यात आता बच्चू कडू यांचे नाव आले आहे. याविषयी त्यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासोबत बच्चू कडू यांचाही फोन टॅप झाला होता.

‘चौकशी झाली तर काय घडले, ते सांगेन’

तस्करी करतो, असे सांगून फोन टॅप करण्यात आले होते. यावर आक्रमक भूमिका घेत बच्चू कडूंनी स्वत:चा बचाव केला आहे. अफू, गांजा तस्करीप्रकरणी संबंधित फोन टॅप करण्यात आले होते. माझ्या पीएचा फोन टॅप करण्यात आला होता. नेत्याचा फोन टॅप केला गेला, हा नालायकपणा आहे. दरम्यान, या प्रकरणात मला कोणत्याही अधिकाऱ्याच्या, पक्षाच्या क्लिनचीटची गरज नाही. अशी वेळ या बच्चू कडूवर येणार नाही. काही केले असेल तर सिद्ध करावे. त्यासाठी कोणाच्या पाया लागण्याची गरज नाही. माझा दुरून दुरून संबंध नाही, तर का म्हणून यावर चर्चा करायची, असा सवाल करत यावर चौकशी झाली तर काय घडले ते सांगेन, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले बच्चू कडू?

‘मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला’

मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मंत्रीपद न मिळाल्याने नाराज नसल्याचे कडू म्हणाले. आमचे काही मुद्दे आहेत. त्यावर आमची लढाई सुरू राहील. 15 सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे. माझ्या कामानिमित्त बाहेर असल्याने येवू शकलो नाही. व्यक्तीगत हितासाठी नाराज होणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी टोला लगावला. पक्षनिष्ठेवरून आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला होता. त्याविषयी विचारले असता पक्षनिष्ठा नाही तर जनतेशी निष्ठा महत्त्वाची असते, असा टोला त्यांनी लगावला.