बदलापूरमधील घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शाळेमध्ये दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातीला आरोपी अक्षय शिंदे याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे. आता अशाच प्रकारची एक घटना वसई येथून समोर आली आहे. नायगाव येथील शाळेमध्ये 7 वर्षांच्या चिमुकलीवर 4 ते 5 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
बदलापूर घटनेनंतर नायगाव पोलिसांनी प्रत्येक शाळेत गुड टच आणि बॅड टच हे शिबिर घेतलं गेलं होतं. त्यानंतक पीडित मुलीने आपल्या शिक्षिकेला ही घटना सांगितली आणि हा सर्व प्रकार उघड झाला आहे. याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात विनयभंग, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून, अल्पवयीन मुलाला अटक करून, रिमांड होम मध्ये रवाना केले आहे. अल्पवयीन आरोपीने मुलगी वॉश रूम, हॅन्ड वॉश करायला जाताना पीडित मुलीला स्पर्श करणे, नको त्या ठिकाणी हात लावणे हे प्रकार करीत होता.
पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 आणि 13 ऑगस्टला सफाई कामगाराने मुलींवर लैंगिक अत्याचार केले. त्यातील एका मुलीच्या पालकांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. तपासणीनंतर तिच्या गुप्तांगाला दुखापत झाल्याचे समोर आले. 16 ऑगस्ट रोजी पालक तो अहवाल घेऊन शाळेत गेले. मात्र शाळेने सायकलमुळे जखम झाली असावी अथवा शाळेबाहेर काही घडले असावे, असा दावा केला आणि आरोप फेटाळून लावले. पालक याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले. पण तिथे त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. साधी तक्रार दाखल करुन घेण्यासाठी पोलिसांनी 12 तास लावले होते.
दरम्यान, या घटनेनंतर बदलापूरकरांनी मोठं आंदोलन केलं होतं. रेल्वे स्टेशनवरच ठिय्या दिला होता, मात्र पोलिसांनी आंदोलकांना हुसकावून लावलं. या प्रकरणात लिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आलं आहे. आता या प्रकरणातील आरोपीला काय शिक्षा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.