मुंबईः मागील गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे ज्या पद्धतीने बोलत आहेत. ती वक्तव्य हसण्यासारखीच आहेत अशी टीकी शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी केली आहे. ठाकरे गटाचे नेत्या हे सरकार घटनाबाह्य असल्याची टीका करतात. मात्र कामासाठी निवेदन देण्यासाठी हेच नेते मंडळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जातात असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे. किरण पावसकर यांनी ठाकरे गटावर टीका करताना हे सरकार दुटप्पी असल्याची टीका केली आहे.
एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे सामना वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर सरकारची जाहिरात छापायची असा प्रकार ठाकरे गटाचा चालला आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
ज्या प्रमाणे महाविकास आघाडीतून बंडखोरी करून 40 आमदार शिंदे गटात सामील झाले. त्याच प्रमाणे आताही ठाकरे गटातून काही लोकप्रतिनिधी शिंदे गटात सामील होत आहेत.
सध्या वरळीमधून दोन नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्याविषयही बोलताना आदित्य ठाकरे म्हणतात की, त्यांच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही त्यामुळेच त्यांच्या या वक्तव्याबद्दल हसू येत असा टोला किरण पावसकर यांनी लगावला आहे.
आदित्य ठाकरे यांना आपल्या स्वतःवर विश्वास असेले तर मग त्यांनी ज्या ठिकाणी राहता कलानगरमध्ये राहता मग तुम्ही वरळीतून का उभा राहिला असा खोचक सवालही किरण पावसकर यांनी केला आहे.
सध्या ठाकरे गटाचे राजकीय चित्र वेगळे असून ज्या ठाकरे गटाचे उमेदवार जिथून उभा राहतील तिथून ते पडणार असा इशाराही शिंदे गटाने ठाकरे गटाला दिला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वक्तव्याबददल बोलताना सांगितले की, जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः आपण इतिहासकार बनायला जाऊ नये असा टोला त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे.