मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे (Gram Panchayat Elections) निकाल हाती आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत नागरिकांनी भरभरून मतदान केलं. बाळासाहेबांच्या शिवसेनेला 500 पेक्षा जास्त सरपंचांच्या जागा विजयी करून दिल्या. त्याबद्द्ल मतदारांना धन्यवाद. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या (Balasaheb’s Shiv Sena) कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन. कारण त्यांनी या निवडणुकीसाठी प्रचंड मेहनत घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, निवडणुकीतील यश, अपयश हे जनतेच्या हातात असतं. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी आमच्या बाजूनं कौल दिलांय. या ग्रामपंचायतीमध्ये चित्र स्पष्ट झालं आहे. ही भूमिका लोकमान्य झाली आहे.
बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांना या निवडणुकीत चांगलं बहुमतं मिळालं. लोकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी विश्वासानं मतदान केलं. सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकास होईल, असा विश्वास त्यांना आहे.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपनं माघार घेतली. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रमेश लटके हा आमचा सहकारी आमदार होता. त्यांचं निधन झालं. शरद पवार, राज ठाकरे तसेच प्रताप सरनाईक यांनी अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आवाहन केलं.
राज्याची प्रथा, परंपरा पाहत आलो. त्यानुसार, आमदाराचा मृत्यू झाल्यानंतर घरातलं कुणी उभं राहीलं तर बिनविरोध निवड होते. भाजपनं जोरात तयारी केली होती. त्यांना जिंकण्याचा विश्वास होता. पण, सर्वांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
माझी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशीही चर्चा केली. त्यानंतर उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला. राज्यातील प्रथा, परंपरा कायम राखण्याचं काम भाजपनं केलं आहे. त्यामुळं उमेदवारी मागं घेतली आहे, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं.
मुंबई मनपाचीही निवडणूक जवळ आहे. तेव्हा कळेल काय होतं तर…