सुप्रियाताई झाल्या, अजितदादा झाले, जयंत पाटील झाले आता ‘या’ नेत्याचेही बॅनर झळकले…

| Updated on: May 24, 2023 | 10:43 PM

कल्याणच्या पत्रिपूल परिसरात कल्याण डोंबिवली शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्यावतीने लावण्यात आलेल्या बॅनरवरून राजकीय क्षेत्रात याची चर्चा होऊ लागली आहे.

सुप्रियाताई झाल्या, अजितदादा झाले, जयंत पाटील झाले आता या नेत्याचेही बॅनर झळकले...
Follow us on

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून विरोधी गटातील पक्षामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो झळकले आहेत. तर सत्ताधाऱ्यांमधील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही भावी मुख्यमंत्री म्हणून जोरदार चर्चा चालू झाली होती. एकीकडे भाजप वारंवार आगामी निवडणुकीतही भाजप शिवसेनाच सत्तेत येणार असल्याचे सांगत विरोधकांना अनेकांना सुनावण्यात आले आहे. एकीकडे भाजपमधून भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले जाते तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेच आगामी काळातही ते मुख्यमंत्री राहतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

तर दुसरीकडे विरोधकांच्या कार्यकर्त्यांनीही अनेक वेळा बॅनरबाजी करत विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. त्यामुळे त्यावेळी या गोष्टीची प्रचंड चर्चा सुरु झाली होती.

तर आता काँग्रेसच्या नेत्याचेही डोंबिवलीत बॅनर झळकल्याने आता पुन्हा एकदा चर्चेला उधान आले आहे. भाजप, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचे बॅनर दिसल्याने आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीची चर्चा होऊ लागली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी झाल्याने जोरदार राजकीय चर्चा होऊ लागल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील म्हणजेच महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांचेच फोटो झळकू लागल्यामुळे आघाडीत बिघाडी आहे का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

डोंबिवलीमधील सर्वेश हॉलमध्ये उदया माजी पंतप्रधान व भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी गौरव पुरस्कारासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाना पटोले येणार आहे.

त्या कार्यक्रमाचे बॅनर अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. त्याच बरोबर नाना पटोले यांच्याही फोटोचे बॅनर आणि त्यावर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असल्याने याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

कल्याणच्या पत्रिपूल परिसरात कल्याण डोंबिवली शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्यावतीने लावण्यात आलेल्या बॅनरवरून राजकीय क्षेत्रात याची चर्चा होऊ लागली आहे.

भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील तर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून अजूनही उद्धव ठाकरे यांच्याही नावाची चर्चा होत होती. त्यामुळे आता अनेकांना राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.