मुंबईकरांना ‘बेस्ट’ दिलासा, 5 किमीसाठी केवळ 5 रुपये तिकीट

| Updated on: Jun 21, 2019 | 11:55 AM

बेस्ट बसने नव्या भाडेदराचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार पाच किमीसाठी केवळ 5 रुपये तिकीट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईकरांना बेस्ट दिलासा, 5 किमीसाठी केवळ 5 रुपये तिकीट
Follow us on

मुंबई : बेस्ट बसने नव्या भाडेदराचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार पाच किमीसाठी केवळ 5 रुपये तिकीट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढीसाठी ‘बेस्ट’ उपक्रमाने हा नव्या भाडेदराचा प्रस्ताव तयार केला आहे.  त्यानुसार पाच किलोमीटर अंतरासाठी किमान भाडे पाच रुपये निश्चित करण्यात आले आहे. साध्या बससाठी पहिल्या 5 किमीला 5 रुपये तर एसी बससाठी 6 रुपये किमान तिकीट दर असेल.

या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. बेस्ट उपक्रमाला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिकेने सहा महिन्यांसाठी 600 कोटी रुपये देण्याचे नुकतेच मान्य केले आहे. मात्र तीन महिन्यांत बदल दिसले पाहिजेत, अशी अट घालताना बेस्टचे किमान भाडे पाच रुपये करण्याचे आदेश करारात आहेत. हे बदल न झाल्यास अनुदानाचा हप्ता देण्यात येणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.  त्यानुसार बेस्ट उपक्रमाने नवीन भाडेदराचा प्रस्ताव तयार केला आहे.

नवीन प्रस्तावानुसार प्रौढ आणि लहान मुलांसाठी भाडेदर सारखेच राहतील. आज बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा होईल आणि मंजुरीनंतरच नवीन भाडे लागू होणार आहे.

नव्या भाडेदर प्रस्तावानुसार चार टप्प्यानुसार तिकीट दर ठरवण्यात येतील. त्यानुसार 5 किमी, 10 किमी, 15 किमी आणि त्यापुढे असे हे चार टप्पे असतील. त्यानुसार 5 किमीपर्यंत 5 रुपये, 10 किमीपर्यंत 10 रुपये, 15 किमीला 15 रुपये आणि त्यापुढील टप्प्याला 20 रुपये तिकीट दर असेल.  एसी बसचे प्रवास आणि तिकीटाचे टप्पे वेगळे असतील.

संबंधित बातम्या 

मुंबई : बेस्ट बस वाचवण्यासाठी खालसा कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या हटके आयडिया   

 ‘या’ 10 निकषांवर ‘बेस्ट’चा संप मागे