मुंबई : ‘बेस्ट’ (BEST) कर्मचाऱ्यांची दिवाळीही आता गोड होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेस्टच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी बोनसची घोषणा केली. ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना दहा हजार शंभर रुपयांचा बोनस मिळणार आहे. (BEST employees to get Diwali Bonus Mumbai Mayor Kishori Pednekar announces)
बृहन्मुंबई महापालिकेकडून दोन दिवसांपूर्वीच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 15 हजार 500 रुपये बोनस जाहीर झाला. त्यानंतर ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांनीही बोनससाठी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेस्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 हजार 100 रुपये इतके सानुग्रह अनुदान जाहीर केले.
कोरोना काळात बेस्टमधील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना ने-आण करण्याचे महत्वपूर्ण काम केले असल्यामुळे त्यांना सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे या भूमिकेतून बेस्टसाठी बोनस जाहीर करण्यात आला आहे. भायखळ्यातील महापौर निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत पेडणेकरांनी बोनसची घोषणा केली.
बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर बेस्टमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तीन नोव्हेंबर 2020 रोजी वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत बेस्टच्या कर्मचारी युनियनसोबत सकारात्मक चर्चा झाली होती.
मुंबई महापालिका कामगारांना यंदा 15 हजार 500 रुपये बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे कामगारांच्या बोनसमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 500 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीला अवघे काही दिवस बाकी असताना मुंबई महापालिकेने कामगारांसाठी ही भेट देऊन कामगारांची दिवाळी गोड केली आहे.
कोरोना महामारीच्या काळात बेस्ट कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम केलं. त्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांही सन्मान व्हायला हवा. मागील वर्षी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना 5 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आलं होतं. पण यंदा महापालिका कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 15 हजार 500 रुपये देण्याची मागणी बेस्टच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. (BEST employees to get Diwali Bonus Mumbai Mayor Kishori Pednekar announces)
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 4 PM | 4 November 2020https://t.co/6zl32ZEmF5 #NewsUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 4, 2020
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, आता ‘बेस्ट’चे कर्मचारी आक्रमक!
मुंबई महापालिकेची दिवाळी भेट; कामगारांना 15 हजार 500 रुपये बोनस जाहीर
(BEST employees to get Diwali Bonus Mumbai Mayor Kishori Pednekar announces)