धक्कादायक ! एसटीसाठी दुष्काळात तेरावा महिना, तरीही बेस्ट थकलेली एवढी मोठी रक्कम देईना

| Updated on: Nov 23, 2022 | 6:22 PM

कोरोनाकाळात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये एसटी महामंडळाने सुमारे १२०० गाड्या रायगड, कोकणातून तसेच आजूबाजूच्या जिल्ह्याच्या आगारातून मागवल्या होत्या.

धक्कादायक ! एसटीसाठी दुष्काळात तेरावा महिना, तरीही बेस्ट थकलेली एवढी मोठी रक्कम देईना
Follow us on

अतुल कांबळे, Tv9मराठी, मुंबई : एकीकडे एसटीची अवस्था खस्ती असतानाही कोरोना काळात  ( BEST ) बेस्टच्या मदतीला एसटी धावून आली होती. बेसच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारण्याचा इशारा दिला होता. प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून त्यावेळी बेस्टच्या मदतीला लालपरी एसटी धावली होती. एसटीच्या (MSRTC ) हजारो गाड्या मुंबईच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यामुळे एसटीने असे तगडे बिल पाठवले की बेस्टने त्यास अक्षरश: वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या. कोरोना काळात बेस्ट कर्मचा-यांनी संप पुकारण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून तेव्हा एसटी महामंडळाला पाचारण करण्यात आले…पण वाचा पुढे काय झाले ते…

बेस्टने १८ मे २०२० रोजी संपाचा इशारा दिला होता. त्यामुळे कोरोनाकाळात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये एसटी महामंडळाने सुमारे १२०० गाड्या रायगड, कोकणातून तसेच आजूबाजूच्या जिल्ह्याच्या आगारातून मागवल्या होत्या. त्यापैकी ६५३ गाडया प्रत्यक्षात मुंबईत दाखल झाल्या. मात्र दरम्यान मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाला आणि संप काही झालाच नाही. या गाड्यांसाठी लागणारा खर्च आणि चालक व वाहकांचे वेतन, जेवण भत्ता आदीचे २ कोटी ४२ लाखांचे बिल पाठवले.

मात्र बेस्टचा संभावित संप मिटल्याने जर गाड्यांचा वापरच झाला नाही तर दोन कोटींचे बिल कसे काय झाले असाही मुद्दा निर्माण झाला होता, ही रक्कम भरायची कोणी ? असा सवाल बेस्टमध्ये चर्चेत आला होता. तेव्हा कोरोना काळात बेस्टचे सर्व व्यवहार पालिकेच्या मदतीवरच चालत होते.

आताही बेस्ट पालिकेच्या आर्थिक मदतीवरच अवलंबून असल्याने हे बिल पालिकेनेच देणे उचित असल्याचे बेस्टचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी स्पष्ट केले. तर एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आहे. बेस्टने अशावेळी त्वरीत देणी द्यावीत अशी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी टीव्ही नाईनशी बोलताना केली.