मुंबई : गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर आजही तोडगा निघाला नाही. आज संपाबाबत मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. मात्र, तिथेही काही तोडगा निघाला नाही. मुंबई हायकोर्टात बेस्ट संपाबाबत उद्या दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे हायकोर्टाची नेमकी संपावर भूमिका काय, यासाठी उद्याची वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरुच राहणार आहे. बेस्टच्या संपावर आज तरी तोडगा निघेल, अशी आशा होती. मात्र, आजही काहीच झालं नाही, त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल असेच सुरु राहणार आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयात जी याचिका दाखल झाली होती, त्यावरही सुनावणी होणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत असून यामुळे सुमारे 50 लाख मुंबईकरांना वेठीस धरले जात आहेत. हा संप बेकायदेशीर असून कोर्टाने कर्मचाऱ्यांना त्वरित रुजू होण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करत अॅड. दत्ता माने यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर राज्य सरकार आणि मुंबई महापालिका बाजू मांडली.
मनसेचा पाठिंबा
मनसेनंही (MNS) बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा दिला आहे. शिवसेनेनं बेस्टच्या कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावल्याचा आरोप मनसेनं केला. तसंच सरकारनं बजावलेल्या मेस्माच्या नोटीसची होळीही मनसेनं केली. तर माहिममध्ये कनेकिया बिल्डर विरोधात मनसेने आंदोलन केले. यावेळी बेस्टच्या जागेवर सुरु असलेले कनेकिया बिल्डरचे काम मनसेने थांबवले. बेस्टचे 320 कोटी रुपये कनाकिया बिल्डरकडे थकित ठेवल्याचा आरोप करत हे काम थांबवत मनसेने आंदोलन केले.
काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या?