मुंबई: मानवाधिकार कार्यकर्ते आणि कोरोगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेल्यांपैकी फादर स्टॅन स्वामी यांचं मुंबईतील होली फॅमिली रुग्णालयात निधन झालं. ते ८४ वर्षाचे होते. विशेष म्हणजे आजच स्टॅन यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार होती. (Bhima Koregaon Violence Case Accused Stan Swamy Passed Away In Hospital)
फादर स्टॅन स्वामी पार्किनसन्ससह अनेक व्याधींनी ग्रस्त होते. त्यांनी गेल्या वर्षी कोरोनाची लागणही झाली होती. प्रकृती बरी नसल्याने त्यांना होली फॅमिली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. स्टॅन यांच्या वकिलांनी त्यांची तब्येत सातत्याने खालावत असल्याची माहिती कोर्टाला दिली होती. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे.
पुण्यात 2018मध्ये एल्गार परिषदेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर भीमा कोरेगाव परिसरात हिंसा उसळली होती. त्यावेळी अनेक दुकाने आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यात एकाचा मृत्यूही झाला होता. या घटनेप्रकरणी अनेकांची धरपकड करण्यात आली होती. नक्षलवाद्यांशी संपर्क असल्याच्या कारणावरून अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात स्टॅन यांचाही समावेश होता.
फादर स्टॅन आणि त्यांचे सहकारी बंदी असलेल्या माकपा (माओवादी) या संघटनेशी संबंधित असल्याचा त्यांच्यावर एनआयएने आरोप केला होता. तसेच एक प्रतिज्ञापत्रं सादर करून एनआयएने स्टॅन यांच्या जामिनाला विरोध केला होता. स्टॅन यांच्या आजाराचा काहीही ठोस पुरावा नाही. स्टॅन हे माओवादी असून देशात अशांतता निर्माण करण्यासाठी ते षडयंत्र रचत होते, असा दावा एनआयएने केला होता. (Bhima Koregaon Violence Case Accused Stan Swamy Passed Away In Hospital)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5 July 2021 https://t.co/O0EiZA3kdM #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 5, 2021
संबंधित बातम्या:
कोरेगाव भीमा दंगल हे फडणवीस सरकारचं षडयंत्र, पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र : सूत्र
भीमा कोरेगावला भीम आर्मी आणि ब्राह्मण महासंघ आमनेसामने?
भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद अद्यापही नजरकैदेत
(Bhima Koregaon Violence Case Accused Stan Swamy Passed Away In Hospital)