Bhiwandi Wall Collapse | भिवंडीत खोदकाम करताना पाया धसल्याने घराची भिंत कोसळली, दोघे तीन तास ठिगाऱ्याखाली

| Updated on: Sep 01, 2020 | 9:14 PM

भिवंडी शहरातील अंजुरफाटा शिवाजीनगर येथे एक बैठ्या घराची भिंत कोसळून दुर्घटना झाली.

Bhiwandi Wall Collapse | भिवंडीत खोदकाम करताना पाया धसल्याने घराची भिंत कोसळली, दोघे तीन तास ठिगाऱ्याखाली
Follow us on

भिवंडी : सर्वत्र विसर्जनाची धामधूम सुरु असताना सायंकाळी साडे चार वाजताच्या सुमारास (Bhiwandi Wall Collapse) भिवंडी शहरातील अंजुरफाटा शिवाजीनगर येथे एक बैठ्या घराची भिंत कोसळून दुर्घटना झाली. या दुर्घटनेत घरा शेजारील गल्लीत खोदकाम करणाऱ्या तीन मजुरांसह एक स्थानिक युवक जखमी झाले. तर, दोन जण तब्बल तीन तास ढिगाऱ्या खाली अडकून होते (Bhiwandi Wall Collapse).

अंजुरफाटा शिवाजीनगर येथील सार्वजनिक शौचालयाजवळच्या दुमजली इमारत आणि या दुर्घटनाग्रस्त घरामधील अरुंद गल्लीत इमारतीच्या शौचालयाच्या मलनि:सारण पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु होते. त्यासाठी या अरुंद गल्लीत तीन मजूर खोदकाम करत असताना या खोदकामामुळे जवळच्या घरा खालील पाया धसल्याने या घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली खोदकाम करणारे विशाल, अनुष आणि विष्णुदेवा चव्हाण हे तीन मजूर अडकून पडले होते. तर त्यावेळी त्या ठिकाणाहून जाणार स्थानिक युवक गणेश हा जखमी झाला आहे (Bhiwandi Wall Collapse).

विष्णुदेवा ने कशीबशी स्वतःची सोडवणूक करुन घेतली. मात्र, ढिगाऱ्याखाली दोन मजूर सुमारे तीन तास अडकून पडले. या घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दल, आपत्कालीन पथकातील कर्मचारी आणि नारपोली पोलीस घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा उपसण्याचे काम सुरु केले.

कविता चंद्रमौळी एलगट्टी या विधवा महिलेचे हे घर असून ती आपली दोन लहान मुलींना घेऊन घराबाहेर बसली असल्याने ते सुदैवाने बचावली. गेल्या तीन दिवसांपासून खोदकाम सुरु असल्यामुळे भिंतीचा आवाज येत असल्याची तक्रार तिने इतरांकडे केली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने सदरची दुर्घटना घडली, असं सांगितलं जात आहे. घटनास्थळी महानगरपालिका मुख्यालय उपायुक्त डॉ. दीपक सावंत, सहाय्यक आयुक्त नूतन खाडे, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी भेट देत मदातकार्याची माहिती घेतली.

Bhiwandi Wall Collapse

संबंधित बातम्या :

Mahad Building Collapse | महाड दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल