पावसाने असंख्य दुचाकींची वाट, किक मारुन मुंबईकर हैराण

| Updated on: Sep 04, 2019 | 7:35 PM

एकीकडे रेल्वे वाहतूक (Railway Transport) विस्कळीत आहे, तर दुसरीकडे रस्त्यांवरही पाणी साठले आहे. त्यामुळे दुचाकींसह बसेस देखील बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना इकडे आड, तिकडे विहीर अशी स्थिती तयार झाली आहे.

पावसाने असंख्य दुचाकींची वाट, किक मारुन मुंबईकर हैराण
Follow us on

मुंबई : मुसळधार पावसाने (Heavy Rain) मुंबईच्या वेगाला पुन्हा एकदा ब्रेक लावला आहे. मुंबईसह (Mumbai) उपनगरात जोरदार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. एकीकडे रेल्वे वाहतूक (Railway Transport) विस्कळीत आहे, तर दुसरीकडे रस्त्यांवरही पाणी साठले आहे. त्यामुळे दुचाकींसह बसेस देखील बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना इकडे आड, तिकडे विहीर अशी स्थिती तयार झाली आहे.

बेस्टने (BEST) दिलेल्या माहितीनुसार आज (4 सप्टेंबर) दिवसभरात एकूण 77 बस बंद पडल्या. त्यातील 40 बसेस केवळ पावसाच्या पाण्यामुळे खराब झाल्या. बेस्टने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी 77 पैकी 16 बसेस दुरुस्त केल्या आहेत.

मुंबईतील किंग सर्कल (सायन) येथे देखील अनेक प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक प्रवाशांच्या गाड्यांमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे. त्यामुळे गाड्या बंद होऊन ट्रॅफिक खोळंबली आहे. त्या गाड्या सुरू करण्यासाठी प्रवाशांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, खाली साठलेले पाणी आणि आकाशातून कोसळणारा मुसळधार पाऊस अशास्थितीत वाहनांसह माणसंही अडकून पडली आहेत.

पावसात अडकल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मुंबई पोलीस वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या सहकार्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मात्र, दुसरीकडे हा सर्व दोष बीएमसीचा असल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. गांधी बाजारात 3 फुटांपर्यंत पाणी असून सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन देखील काही नागरिकांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केले. किंग सर्कल आणि माटूंगा ते दादर उड्डाणपुलाच्या येथेच नेहमी पाणी साठत आहे. त्याकडे मुंबई महापालिका दुर्लक्ष करत असल्याची तक्रार देखील मुंबईकर करत आहेत.