मुंबई : सुधीर तांबे यांचं काँग्रेस पक्षाकडून निलंबन करण्यात आलं आहे. उमेदवारी देऊनही सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळं सुधीर तांबे यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. सुधीर तांबे हे सत्यजित तांबे यांचे वडील आहेत. काँग्रेसकडून सुधीर तांबे यांचे निलंबन करण्यात आले आहे. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्यावर काँग्रेसकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाची उमेदवारी सुधीर तांबे यांना देण्यात आली होती. पंरतु,त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला नाही. उलट त्यांचा मुलगा सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळं काँग्रेसची अडचण झाली.
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी हायकमांडला यासंदर्भातील अहवाल पाठविला होता. त्यानंतर शिस्तपालन समितीची ही कारवाई करण्यात आली आहे. सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्याविरोधात चौकशीही केली जाणार आहे. अधिकृत उमेदवार असताना त्यांनी अर्ज भरला नव्हता.
दुसरीकडं महाविकास आघाडीच्या नेत्यांची व्हिडीओ कान्फरन्सिंगद्वारे आज रात्री बैठक पार पडणार आहे. नाशिकमधील निवडणुकीबाबत यासंदर्भात रणनीती ठरणार असल्याची माहिती आहे. नागपूरमध्ये काँग्रेस कुणाला पाठिंबा देणार यावरही चर्चा होणार आहे. जयंत पाटील, नाना पटोले, सुभाष देसाई, अभिजित वंजारी या बैठकीत सहभाग घेणार आहेत.
काय घडामोडी होतात त्यापेक्षा निवडणूक महत्त्वाची आहे, अशी प्रतिक्रिया सुधीर तांबे यांनी दिली. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे हे १८ जानेवारीला भूमिका स्पष्ट करणार आहेत. नाशिकमध्ये भाजपचा एबी फार्म कुणाला मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांनी भाजप एबी फार्म देतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अजूनही आम्हाला कुणीही पाठिंबा मागितला नसल्याचं भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं. सुधीर तांबे हे प्रचारात व्यस्त आहेत. ते मुलाच्या प्रचारासाठी अनेकांच्या भेटीगाठी घेत आहेत.