Big Breaking : पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळात मोठा बदल, मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खात्यांबाबत मोठी अपडेट समोर

| Updated on: Jul 16, 2023 | 11:39 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत. ही सर्व खाती शिंदे गटाच्या आमदारांनाच देण्यात आली आहे. सभागृहामध्ये या खात्यांसंदर्भात जे काही प्रश्न उपस्थित केले जातील त्याची उत्तरे या मंत्र्यांकडून दिली जाणार आहेत.

Big Breaking : पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळात मोठा बदल, मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खात्यांबाबत मोठी अपडेट समोर
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : पावसाळी अधिवेशन उद्या म्हणजेच 17 जुलैला सुरू होणार आहे. मात्र याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही खाती वर्ग करण्यात आली आहे. ही सर्व खाती शिंदे गटाच्या आमदारांनाच देण्यात आली आहे. सभागृहामध्ये या खात्यांसंदर्भात जे काही प्रश्न उपस्थित केले जातील त्याची उत्तरे या मंत्र्यांकडून दिली जाणार आहेत.

कोणाकडे कोणत खातं?

गुलाबराव पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन, उदय सामंत यांच्याकडे नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञान, शंभूराज देसाईंकडे सामाजिक न्याय आणि दिव्यांग, दादा भूसे यांना परिवहन, अब्दुल सत्तारांकडे खनिकर्म आणि दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण खातं देण्यात आलं आहे. आताच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामधील मंत्र्यांचंही खातेवाटेप झालं आहे.

राष्ट्रवादीमध्ये कोणाला कोणतं खातं?

अजित पवार – अर्थ, नियोजन, छगन भुजबळ – अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, धर्मरावबाबा अत्राम – औषध व प्रशासन, दिलीप वळसे पाटील- सहकार, धनंजय मुंडे – कृषी, हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण, अनिल पाटील- मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, आदिती तटकरे- महिला आणि बालकल्याण आणि संजय बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

अधिवेशनाचा पहिला दिवस कोण गाजवणार?

पावसाळी अधिवेशनाच पहिला दिवस सत्ताधारी की विरोधक कोण गाजवणा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काँग्रेसचा विरोधी पक्षनेता सोमवारीच जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहेत. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार काँग्रेसमधील ही नाव चर्चेत आहेत.