ऐन निवडणुकीत भाजपची किरीट सोमय्यांवर मोठी जबाबदारी, मोहीम फत्ते करणार?; आघाडीला ताप होणार?

| Updated on: Sep 10, 2024 | 1:24 PM

Kirit Somaiya : ऐन निवडणुकीत भाजपची किरीट सोमय्यांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला ताप वाढणार असल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीआधी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर कोणती जबाबदारी देण्यात आली आहे? वाचा सविस्तर......

ऐन निवडणुकीत भाजपची किरीट सोमय्यांवर मोठी जबाबदारी, मोहीम फत्ते करणार?; आघाडीला ताप होणार?
किरीट सोमय्या
Follow us on

भ्रष्ट कारभाराची यादी वाचून दाखवत विरोधी पक्षातील नेत्यांना घाम फोडणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. असं असतानाच भाजपने किरीट सोमय्या यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजपने ‘विधानसभा निवडणूक संपर्क प्रमुख’पदी किरीट सोमय्या यांची निवड केली आहे. त्यांची ही निवड करत भाजपने विरोधी पक्षांना एक प्रकारे इशाराच दिला आहे.

किरीट सोमय्यांवर मोठी जबाबदारी

किरीट सोमय्या यांनी मध्यंतरी महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप केले होते. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांवर सोमय्यांनी आरोप केले होते. त्यातीलच काही नेते हे सध्या महायुती सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर किरीट सोमय्या यांच्यावर पक्षाने ‘निवडणूक संपर्क प्रमुख’ पदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सोमय्या अॅक्टिव्ह होण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या अॅक्टिव्ह झाल्यानंतर विरोधी पक्षातील कोणत्या नेत्यांच्या ‘फाईल्स’ समोर आणणार हे पाहणं महत्वाचं असेल.

व्यवस्थापन समितीत कोण- कोण?

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्षाची व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षते खाली समिती जाहीर करण्यात आली आहे. किरीट सोमय्या याना पुन्हा पक्षाचं काम देण्यात आलं आहे. ‘निवडणूक संपर्क प्रमुख’ म्हणून किरीट सोमय्या यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. तर विशेष आमंत्रित म्हणून नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, नारायण राणे, पियुष गोयल, गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप तयारीला लागला आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा निश्चय आहे. मागच्यावेळी जिंकलेल्या 105 जागांपेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत 125 जागा जिंकण्याचा भाजपने संकल्प केला आहे. 50 जागा आपण जिंकू शकतो, असा विश्वास भाजपला आहे. तर उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी राज्यातील वरिष्ठ नेत्यांवर आहे. भाजपची व्यवस्थापन समिती जाहीर करण्यात आली आहे.