मुंबईः मागील काही दिवसांपासून राज्यपाल, भाजप आणि शिंदे गटातील काही आमदारांकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकदा नाही सरळ दोन वेळा ज्या व्यक्तींना महाराष्ट्रातच नाही तर देशातही ज्यांचं नाव आदराने घेतले जाते. अशा व्यक्तीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून काढले होते.
त्यामुळे आता भाजपच्या विरोधी पक्षाकडून राज्यपालांसह आज प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यामुळे आज काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
त्यांनी भाजपवर टीका करताना, भाजपकडून देशात पेशवाई आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे सरकारचा कडेलोट करणारच अशा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
त्यामुळे आता भाजपच्या विरोधात काँग्रेससह शिवसेना आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हेही आक्रमक होत त्यांनी राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे.
तर कोल्हापूरचे माजी खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्यपालांची राज्यातून हकालपट्टी केल्याशिवाय रस्त्यावरची लढाई थांबणार नाही असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.काँग्रेस
चे आमदार नाना पटोले यांनी थेट भाजपवर भाजप राज्यात पेशवाई आणण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे या सरकारचा कडेलोच करणाच असा इशारा देण्यात आला आहे.
भाजपचे खासदार उदयनराजे यांनी मागील दोन ते तीन दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेत त्यांनी भाजपसोबतच राज्यपाल कोश्यारींवर जोरदार टीका करण्यात येत आहे.
त्यावरून त्यांनीही वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांची मुंडकी छाटून टाकावी असं वाटतं असं वक्तव्य केले होते. भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी कराच या मतावर आपण ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
त्यानंतर आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत राज्यात पेशवाई आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे असा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
एकीकडे राज्यपाल कोश्यारी यांचा वाद चालू असतानाच दुसरीकडे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मविषयी बोलून नवा वाद निर्माण केला आहे.
त्यामुळे सरकार विरोधात शिवप्रेमींच्या आणि विरोधकांच्या भूमिका आता आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळेच सरकारचा कडेलोट करणार असा इशारा आमदार नाना पटोले यांनी दिला आहे तर माजी खासदार संभाजीराजे यांनी हकालपट्टी होत नाही तोपर्यंत रस्त्यावरची ही लढाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.