मुंबई : शिवसैनिकांनी, आमदारांनी, मंत्र्यांनी आणि स्वत: मुख्यमंत्र्यांनीही आता खरच आत्मचिंतन गंभीरपणे केलं पाहिजे. तशी वेळ आली आहे, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार (BJP Leader Ashish Shelar) यांनी केली आहे.
‘निधी मिळत नाही?’
महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Government)वर टीका करताना पुढे ते म्हणाले, आमच्याशी चर्चा करताना छाती फुगवून अर्धी संधी, अर्धी पद हे सगळे बोलत होते. तर मग आता काय झाले, तुम्ही सत्तेत असतानासुद्धा तुमच्या मंत्र्यांच्या खात्याला निधीच मिळत नाही आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणतात आमच्यामुळे सरकार आहे. याचा विचार त्यांनीच करावा, असे ते म्हणाले.
‘420 कोटीवर भाष्य करत नाही’
किमान आदित्य ठाकरे यांचा तरी या सरकारने विचार करायला हवा होता, एक युवा नेतृत्व काम करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्यक्षात किती होत आहे, हा भाग वेगळा, पण किमान त्यांचा तरी सन्मान करायला हवा होता, असा टोला शेलार यांनी आदित्य ठाकरें(Aditya Thackeray)ना लगावला.
‘सर्वात कमी अधिवेशन घेण्यारे सरकार’
अधिवेशनच होत नाही. त्यामुळे प्रगतीपुस्तक काय मांडणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्राचे अधिवेशन पूर्ण होते, मग महाराष्ट्रात का नाही? हे दुर्दैव आहे. सर्वात कमी अधिवेशन घेण्यारे सरकार म्हणून या सरकारची नोंद होईल, अशी टीका त्यांनी केली.
‘खोट्या गोष्टी दाखवल्या जात आहेत’
माझा शब्द अंडरलाईन करा, हे सरकार साखरझोपेत आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी मंत्रालयात कुणी मंत्री आहेत का? हे सरकार संपूर्णपणे हरवले आहे, असे चित्र आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. मुंबई महापालिकेने 2020पासून लपवलेले मृत्यू आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ, फक्त चांगले आहे ते निवडून घेत त्यावर आपल्या कामाचा डोलारा उभा करण्याचा हा प्रकार आहे. सोशल मीडियातून इमेज बनवत खोट्या गोष्टी दाखवल्या जात आहेत, असा घणाघात शेलारांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.