मुंबई : आमदार अपात्रतेच्या सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वामध्ये शिवसेनेचा एक गट बाहेर पडला होता. या गटाने पक्षावरही दावा केला होता. गेले कित्येक दिवस ही आमदार अपात्रतेची सुनावणी लांबली होती अखेर मुख्यमंत्री शिंदेना मूळ शिवसेना पक्ष दिला गेला आहे. तर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. दोन्ही गटाच्या अपात्रतेच्या याचिका नार्वेकर यांनी फेटाळल्या. त्यामुळे दोन्ही गटामधील कोणताच आमदार अपात्र ठरला नाही. अशातच या निकालाचा धागा भाजपच्या बड्या नेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात सरकार स्थापन केलं होतं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काही आमदारांसह बाहेर पडत बंड केलं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही दोन गट पडले आहेत. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी आपण राष्ट्रवादीत असल्याचं सांगितलं. त्यामुळे हा लढाईसुद्धा कोर्टात जाण्याची शक्यत आहे. आज नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाबाबत बोलताना भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीच्या फुटीवरही भाष्य केलं.
अतिशय स्पष्ट निकाल आलेला आहे. बहुमत ज्याचा आहे त्याचाच पक्ष राहणार आहे. अजित दादा बरोबर 42-43 आमदार आहेत. हाच न्याय राष्ट्रवादीला देखील मिळाला पाहिजे. लोकशाहीमध्ये मतांना आकड्यांना महत्त्व आहे. भविष्यात अजित दादांना देखील असाच निकाल मिळाला पाहिजे, असं गिरीश महाजन यांनी म्हणाले.
दरम्यान, गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांच्याकडे आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शरद पवारांच्या अडचणीतही वाढ होण्याच्या चर्चा दबक्या आवाजात होत आहेत.