नवाब मलिकांकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती, भंगारवाला करोडपती कसा झाला?; मोहित कंबोज यांचा सवाल

| Updated on: Nov 06, 2021 | 12:53 PM

मोहित कंबोज आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांची पोलखोल करणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी हा बॉम्बगोळा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. (BJP leader Mohit Bharatiya expose NCP's Nawab Malik)

नवाब मलिकांकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती, भंगारवाला करोडपती कसा झाला?; मोहित कंबोज यांचा सवाल
Mohit Bharatiya
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडे 3 हजार कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या एकूण 22 संपत्ती आहे, असा गौप्यस्फोट करतानाच भंगारवाला करोडपती कसा झाला? असा सवाल भाजप नेते मोहित कंबोज (भारतीय) यांनी केला आहे.

मोहित कंबोज आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांची पोलखोल करणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी हा बॉम्बगोळा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांच्याकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती आहे. त्यांच्याकडे एकूण 22 संपत्ती आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब फॅमिली ट्रस्टच्या नावाने जोडले गेले आहेत. भंगारवाला करोडपती कसा झाला हे राज्यातील जनतेला कळायला हवं, असं कंबोज म्हणाले.

द एन्ड मीच करणार

आज नवाब मलिक यांची मी सगळी पोलखोल करणार आहे. त्यानंतर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. उत्तरे देण्याचीही त्यांची लायकी उरलेली नसेल, असं सांगतानाच राज्यात सलीम-जावेदने चित्रपट सुरू केला होता. त्याचा द एन्ड मीच करणार. आज सलीम-जावेदच्या चित्रपटाची खरी स्क्रिप्ट आणि खरा चेहरा जगासमोर येणार आहे, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

कुणाचं नटबोल्ट ढिल्लं ते आज कळेल

हॉटेल हे लोकांसाठीच असते. चहापाणी घेण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी लोक हॉटेलात जात असतात. नवाब मलिक कधी फाईव्ह स्टार हॉटेलला गेलेच नाहीत का? त्यांनी जनतेला फिरवण्याचं आणि दिशाभूल करण्याचं काम बंद करावं. नटबोल्ट कुणाचं ढिल्लं होणार आणि कोण पाणी पाणी होईल हे आज त्यांना कळेलच, असंही ते म्हणाले.

आरोप शंभर, पण पुरावा एकही दिला नाही

मलिक यांनी आमच्यावर 100 आरोप केले. पण एकाही आरोपावर पुरावा दिला नाही. ते खासगी त्रासाचा सूड उगवत नाही का? त्यांचे नॅरेटिव्हज सर्व खोटे आहेत. असं राजकारण यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं, असं ते म्हणाले. माझ्या कुटुंबावर आरोप होत होते. तेव्हा भाजपने मला साथ दिली, असंही त्यांनी सांगितलं.

आता नव्या अधिकाऱ्याचेही बर्थ सर्टिफिकेट बाहेर येईल

आता एनसीबीने मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे कुणावरही आरोप होणार नाही. नॅशनल, इंटरनॅशनल अशा सर्व अंगानी आता तपास होईल. आता नवे अधिकारी तपास करणार आहेत. त्यांचंही बर्थ आणि मॅरेज सर्टिफिकेट काढण्याचं काम होईल, असा टोलाही त्यांनी मलिक यांना लगावला.

 

संबंधित बातम्या:

Video : सभा गाजवणारे मंत्री गुलाबराव पाटील जेव्हा कव्वाली गातात…!

सोनिया गांधींनी काँग्रेसशासित राज्यांना पेट्रोल-डिझलचे दर कमी करायला सांगावेत: भाजप

Maharashtra News LIVE Update | पोटनिवडणुकीत दणका, भाजपने राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलावली

(BJP leader Mohit Bharatiya expose NCP’s Nawab Malik)