Nilesh Rane Retirement | केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या सुपुत्राची राजकारणातून तडकाफडकी निवृत्ती, कारणही केलं स्पष्ट!

| Updated on: Oct 24, 2023 | 3:08 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुपुत्राने राजकारणातून तडकाफडकी राजकारणातून निवृत्त व्हायचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राजकारणात सर्वांनाच धक्का बसला असून निवृत्तीबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

Nilesh Rane Retirement | केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या सुपुत्राची राजकारणातून तडकाफडकी निवृत्ती, कारणही केलं स्पष्ट!
Follow us on

मुंबई  : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होणार असल्याचं जाहीर केली आहे. निलेश राणे यांनी तडकाफडकी राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. अचानक राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेण्याचं कारणही नीलेश राणे यांनी स्पष्ट केलं आहे.

नीलेश राणे काय म्हणाले?

मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या 19 ते 20 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं. कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. भाजपमध्ये खूप प्रेम भेटलं आणि भाजपसारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे, असं नीलेश राणे यांनी म्हटलं आहे.

मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचं नीलेश राणेंनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, नीलेश राणे कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्यामध्ये कायम खडाजंगी होत असलेली पाहायला मिळते. अनेकवेळा वादग्रस्त टीका केल्याने ते चर्चेत राहतात. मात्र वडील केंद्रीय मंत्री असताना नीलेश राणेंच्या राजकाऱणातील निवृत्तीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.