मुंबई: प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. त्यावरून वादंग निर्माण झालं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अख्तर यांना पत्रं लिहून या मुद्द्यावर जाहीर चर्चा करा नाही तर जाहिररित्या माफी मागा, असं आव्हानच दिलं आहे. त्यामुळे जावेद अख्तर त्याला काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (bjp leader nitesh rane demands apology from Javed Akhtar)
नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना दोन पानी पत्रं पाठवलं आहे. त्यात त्यांनी अख्तर यांच्या संघाच्या तालिबानशी युती करण्याच्या मुद्द्याला आक्षेप घेतला आहे. संघाची तुलना तालीबानशी करणं हा नियोजीत षडयंत्राचा भाग आहे. तालिबानी प्रवक्त्यासारखी भुमिका घेत कुटनितीनं हिंदुत्वाशी तुलना करण्यात आली आहे. हिंदुत्वाबद्दल एवढा राग कशासाठी?, असा सवाल राणेंनी केला आहे.
कम्युनिस्ट विचारधारा असणाऱ्या सासुसरवाडीचा तुमच्यावर चांगलाच प्रभाव आहे. जो व्यक्ती जिथ राहतो त्यावर प्रेम करतो. मग त्याचा धर्म आणि उपसना पद्धती कोणतीही असली तरी तो आमच्यासाठी हिंदूच आहे. हिंदु धर्माबद्दलच्या अज्ञानाबद्दल आपली दया येतेय, असंही त्यांनी म्हटलं आहे.
तुम्हाला महिलांच्या हक्काबद्दल किती माहिती आहे? ट्रिपल तलाकच्या वाईट परंपरेवर तुम्ही कुठे होता?, असा सवाल करतानाच तुम्हाला एक आठवड्याची मुदत देतो. कोणतही सार्वजनिक व्यासपीठ किंवा न्यूजरूम निवडा या मुद्द्यावर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. अन्यथा बिनशर्त माफी मागा, असंही त्यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनीही जावेद अख्तर यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद निस्वार्थी भावनेने काम करत आहेत. जावेद अख्तर यांनी चुकीचं विधान केलं असून त्यांनीच तालिबानमध्ये जावं, असा अजब सल्ला कपिल पाटील यांनी दिला आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले, “भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंद दल (Bajrang Dal) अफगाणिस्तानमधील तालिबान (Taliban) सारख्याच कट्टरतावादी संघटना आहेत. या संघटनांच्या मार्गात भारताचं संविधान अडसर ठरत आहे. यांना थोडीशी जरी संधी मिळाली तर हे कोणताही संकोच बाळगणार नाहीत. भारतात अल्पसंख्यांक समाजासोबत झालेल्या मॉब लिंचिंगच्या घटना म्हणजे तालिबानसारखं बननण्याआधीची रंगीत तालिम आहे. हे सर्व लोक एकच प्रकारचे आहेत. यांची केवळ नावं वेगळी आहेत.”
एनडीटीव्हीशी संभाषण करताना जावेद अख्तर, ज्यांनी अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता ताब्यात घेण्यास नाखूष असलेल्या भारतीय मुस्लिमांच्या एका वर्गावर टीका केली. ते म्हणाले की, राईट विंग जगात एक आहे. भारतातील अल्पसंख्यांकांच्या मॉब लिंचिंगच्या काही घटनांवर अख्तर म्हणाले, ‘पूर्ण तालिबान बनण्याची ही एक प्रकारची पूर्ण ड्रेस रिहर्सल आहे. ते तालिबानी युक्तीचा अवलंब करत आहेत. ते एकच लोक आहेत, फक्त नाव वेगळे आहे. भारतीय राज्यघटना त्यांचे ध्येय आणि त्यांच्यामध्ये येत आहे, परंतु जर संधी दिली तर ते ही सीमा ओलांडतील.’ (bjp leader nitesh rane demands apology from Javed Akhtar)
My open letter to @Javedakhtarjadu
I am giving u 1 week’s ultimatum: either u decide a public platform or Newsroom to have a debate to justify what u have said,v are ready to ans all ur hatred n misconceptions or otherwise u release an unconditional apology to all Hindus. pic.twitter.com/09nEeJtEb7— nitesh rane (@NiteshNRane) September 6, 2021
संबंधित बातम्या:
‘जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन अतिरेक्यांसोबत राहावं’, चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
पाश्चात्य देशांना लाज वाटली पाहिजे! अफगाणिस्तान प्रकरणावर संतापले जावेद अख्तर आणि शबाना आझमी
(bjp leader nitesh rane demands apology from Javed Akhtar)