मुंबई: कोकणात भाजपचा मी एकटाच आमदार आहे. तरीही मी कोकणवासियांसाठी मोदी एक्सप्रेस सोडू शकतो. तर शिवसेनेच्या आमदारांनी किमान अर्धी ट्रेन का सोडू नये? असा सवाल करतानाच तुम्हाला हे जमत नसेल तर किमान आमच्याकडून तरी धडा घ्यावा, असा चिमटा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज शिवसेनेला लगावला. (bjp leader nitesh rane slams bjp over modi express)
नितेश राणे यांनी टीव्ही9 मराठी बोलताना हा टोला लगावला. नितेश राणे यांच्या प्रयत्नाने गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दादरहून सावंतवाडीपर्यंत मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली आहे. या एक्सप्रेसला हिरवा कंदील देण्यापूर्वी नितेश राणे शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. कोकणात गेल्या दोन वर्षांपासून लोक गेले नाहीत. कोवीडमुळे त्यांना जाता आलं नाही. ती ऊणीव आजमभरून काढली आहे. जर आम्हाला हे जमत असेल तर इतरांनीही यातून धडा घ्यावा, निदान अर्धी ट्रेन तरी सोडावी, असा चिमटा त्यांनी काढला.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी एकटाच आमदार आहे. बाकी सेनेचे आहेत. एक भाजपचा आमदार करू शकतो ते शिवसेनेच्या आमदाराला जमलं नाही याचा मला अभिमान आहे. पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत कोकणातील जनतेने विचार करावा. भाजपला मतदान दिल्यावर एक आमदार ट्रेन सोडू शकतो तर बाकीचे आमदार भाजपचे आमदार असते तर किती ट्रेन सुटल्या असत्या त्याचा कोकणवासियांनी विचार करावा, असं आवाहन राणे यांनी केलं.
राज्य सरकारला सर्व गर्दी हिंदू सणांवर दिसते. दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी दिसते. यांचे नातेवाईक गर्दी करतात ते दिसत नाहीत. नितीन राऊतांनी सरकारमध्ये बसलेल्या कोरोना स्प्रेडरकडे पाहावे. ते मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम करून गर्दी करत आहेत. त्यांना पहिली थोडी ताकीद द्या. मग गणेशोत्सवावर विघ्न आणा, असा हल्लाही त्यांनी चढवला. या सरकारला मोहरमची गर्दी चालते, सभांची गर्दी चालते पण गणेशोत्सवात लोक निघाले की कोरोना निघतो. हे सरकार विघ्न सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
रस्त्यामध्ये विघ्न आणण्याचं काम सरकार करतंय. नॅशनल हायवे केंद्र सरकार बांधत आहे. त्यावर काही नियंत्रण पीडब्लूडी खात्याचं आहे. रत्नागिरीपर्यंतच्या हायवेची सर्व जबाबदारी स्थानिक नेते मंडळीची आहे. आम्ही सिंधुदुर्गात शंभर टक्के रस्ता करून घेतला. रत्नागिरीतील आमदारांना रत्नागिरीतील रस्ते का करून घेता आले नाहीत? त्यामुळे टोल माफी करून फायदा नाही रस्ते चांगले करा. जनतेची सेवा करायची असेल तर खड्डे बुजवण्याचे काम तुम्ही एक महिना आधी घ्यायचं होतं. गणेशोत्सवात का काम करता? रस्ते बनवायचे असतील तर लोक घरापर्यंत जातील असे रस्ते बनवा, असा टोलाही त्यांनी हाणला.
दादर ते वैभववाडी करून सावंतवाडीत ही ट्रेन थांबणार आहे. 18 डब्यांची ही ट्रेन असून 1800 प्रवासी या एक्सप्रेसमधून जात आहेत. त्यांना एकवेळचं जेवणही आम्ही दिलं आहे. ही सोय पहिल्यांदाच झाली आहे. त्यामुळे मोदींचे आभार मानतो. या रत्नागिरी सिंधुदुर्गात धरून एकच आमदार आहे. बाकी सर्व शिवसेनेचे आमदार आहेत. एक भाजपचा आमदार करू शकतो ते शिवसेनेचे आमदार करू शकले नाही, असंही ते म्हणाले. (bjp leader nitesh rane slams bjp over modi express)
संबंधित बातम्या:
मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत ते तपासावे लागेल; नाना पटोलेंचा टोला
ओबीसींच्या सवलतीमुळे अडचणी, मागास आयोग रद्द करा; विनायक मेटे आज मुख्यमंत्र्यांना भेटणार
(bjp leader nitesh rane slams bjp over modi express)