पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील अपघात प्रकरणावरून सध्या वातावरण तापलेलं आहे. सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. अशा दुर्दैवी अपघाताची राजकारणासाठी वापर करणं योग्य नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः जाऊन काडक कारवाई केली जाईल हे सांगितलं आहे. ज्या पबमधून आरोपी गेला होता. त्यावर कारवाई झालेली आहे. विरोधक राजकारण करण्याचा दुर्दैवी आणि केविलवाणा प्रयत्न करत आहेत. सारं काही कठोर केलं जाईल, असं प्रविण दरेकर म्हणालेत. प्रविण दरेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
रविंद्र धंगेकर आणि अनिल देशमुख यांनी या प्रकरणावरून पोलीस यंत्रणा आणि सरकारला सवाल केलेत. यावरही प्रविण दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. नुसता बोल घेवडेपणा करून वातावरण तयार करण्याचा प्रयत्न धंगेकर करत आहेत. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे.जे स्वतः तुरुंगात जाऊन आले त्यांनी नाकाने कांदे सोलू नयेत, असं प्रविण दरेकर म्हणालेत.
शिशिर शिंदे यांची भूमिका योग्य आहे. अस्तानीतील निखारे जवळ बाळगून त्रास होतो.माझा आरोप आहे की, गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांना तिकीट हवं होतं. मग वेळेवर त्यांनी उमेदवारी मागे घेतली असती. अमोल किर्तीकर यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी हे केलं असतं, असंही प्रविण दरेकर म्हणाले.
निवडणूक विभाग अपयशी ठरलं आहे. जे जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी ही भूमिका मी त्याच दिवशी घेतली. कोंबड्याच्या खुरड्यासारखी मतदान केंद्र होती. पाणी नव्हतं. 3-4 % मतदानावर परिणाम झाला. काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी NGO ला पाणी वाटू दिलं नाही. सेंटर आणि रांगा Air Condition असाव्यात. येणाऱ्या अधिवेशनात मी यावर बोलणार आहे, असं म्हणत प्रविण दरेकरांनी ठाकरे गटाच्या आरोपांनी प्रत्युत्तर दिलं आहे.