मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानभवनातून बाहेर पडत असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि गिरीश महाजन यांनी त्यांची गाडी अडवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही गाडी थांबवली. त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि त्यांच्याशी गप्पाही मारल्या. (bjp leaders stop cm uddhav thackeray’s Car at Maharashtra Legislative assembly)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा दुपारी विधानभवनातून बाहेर पडला. त्यावेळी विधानभवनाबाहेरच उभ्या असलेल्या प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि गिरीश महाजन या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही गाडी थांबवली. यावेळी या तिन्ही नेत्यांनी त्यांच्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं. मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन घेतलं. त्यावरून नजर फिरवली आणि विरोधकांशी मनमोकळ्या गप्पाही मारल्या. या चारही नेत्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा झाल्या.
गप्पागोष्टी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जायला निघाले. तेव्हा तिघांनीही आम्हाला तुमच्या गाडीत घ्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यावर एकालाच गाडीत प्रवेस मिळेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर या तिघांनीही दिलखुलास हसून त्याला दाद दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा विधानभवनातून बाहेर पडला.
भेट घेत असताना मागच्या गाडीतून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर खाली उतरले आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ आले. त्यानंतर मिलिंद नार्वेकरांनीही विरोधी पक्षनेत्यांशी गप्पा मारताना त्यांना कोपरखळया लगावल्या.
मिलिंद नार्वेकर :- उद्धव साहेब, यांनी तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे का?
प्रविण दरेकर :- आम्ही केव्हाही येऊ शकतो.
मिलिंद नार्वेकर :- यांना आताच गाडीत या, शिबबंधन बांधूया.
प्रविण दरेकर :- आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो, हे आमचं मूळ आहे.
दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी 5 व 6 जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनाच्या प्रांगणात झाली. या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, मंत्रीमंडळातील सदस्य, विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, संसदीय कार्य विभागाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 22 June 2021 https://t.co/DXYoMfiRxf #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 22, 2021
संबंधित बातम्या:
सरकार पाडणार नाही, पण पडेल त्या दिवशी अल्टरनेट देऊ; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का? आक्रमक फडणवीस बैठकीतून बाहेर
(bjp leaders stop cm uddhav thackeray’s Car at Maharashtra Legislative assembly)