तुम्ही सोनिया गांधींसमोर नतमस्तक झालात, पण आम्ही काहीही झालं तरी दिल्लीसमोर झुकणार नाही; फडणवीसांनी ठणकावलं

| Updated on: Aug 20, 2022 | 2:22 PM

दिल्ली राजकीय राजधानी असेल तर दिल्लीत जावंच लागेल तर त्याशिवाय प्रकल्प कसे पूर्ण होतील असा सवाल करत त्यांनी मविआ सरकारच्या कार्यकाळावरही टीका केली. तुम्ही दिल्लीत गेला, पण सोनिया गांधींसमोर नतमस्तक होण्यासाठी गेला, मात्र काही झालं तरी चालेल पण मुंबई दिल्लीसमोर झुकणार नाही

तुम्ही सोनिया गांधींसमोर नतमस्तक झालात, पण आम्ही काहीही झालं तरी दिल्लीसमोर झुकणार नाही; फडणवीसांनी ठणकावलं
Follow us on

मुंबईः भाजपच्या आज झालेल्या मेळाव्यातून देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis )यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांची नावं न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेऊन मुंबई महानगरपालिकेची दहीहंडी आम्हीच फोडणार असा विश्वासही त्यांनी भाजपच्या मेळाव्याप्रसंगी (BJP Meeting) व्यक्त केला. यावेळी त्यांनी तुम्ही कालची मुंबई पाहिली का? तिच परंपरा संस्कृती ही आपली परंपरा असल्याचे सांगितले. आपलं सरकार आल्यावर काय घडतं हे सर्वांनी पाहिलं आहे, आता सर्व जोरात करायचं आहे. गणेशोत्सव जोरात, नवरात्र जोरात, दिवाळी जोरात, आंबेडकर जयंती जोरात आणि शिवजयंतीही जोरात असं जोरदार अश्वासनं देत आता सर्व काही जोरात करायचं आहे असे सांगत आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाही, आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाही असा टोला लगावत देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

यावेळी त्यांनी सरं मुंबई दिल्लीसमोर झुकणार नाही. कोण झुकवतो आहे. मुंबई मुंबई आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि दिल्ली दिल्ली असून देशाची राजधानी असल्याचे सांगत त्यांनी दिल्लीवरून पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुखांना छेडल्याचे दिसून आले.

दिल्लीला जावच लागले

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुख्यमंत्री दिल्लीत गेले तर दिल्लीश्वरांसमोर झुकले असं म्हणता मात्र अरे एवढे दिवस काँग्रेसचे मुख्यमंत्री, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, त्यावेळीही दिल्लीला जावच लागले होते, त्यामुळे दिल्ली राजकीय राजधानी असल्याने प्रत्येकाला तिथे जावेच लागत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दिल्ली राजकीय राजधानी

दिल्ली राजकीय राजधानी असेल तर दिल्लीत जावंच लागेल तर त्याशिवाय प्रकल्प कसे पूर्ण होतील असा सवाल करत त्यांनी मविआ सरकारच्या कार्यकाळावरही टीका केली. तुम्ही दिल्लीत गेला, पण सोनिया गांधींसमोर नतमस्तक होण्यासाठी गेला, मात्र काही झालं तरी चालेल पण मुंबई दिल्लीसमोर झुकणार नाही असा इशारा देत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करताना जोरदार हल्लाबोल केला.

आशिष शेलार आता थांबायचं नाही…

यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्यासाठी आशिष शेलारांनी आतापासूनच जोरदारपणे काम करावे, त्यानंतर मुंबई महानगरपालिका ही आपलीच असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.