“हिंदूंच्या विरोधात ज्यांनी इतिहास घडविला त्यांना मोठं करण्याचं काम मविआने केलं”; भाजप नेत्याने ‘मविआ’ला हिंदूविरोधी ठरवलं

| Updated on: Jan 29, 2023 | 6:38 PM

हिंदू मराठा मोर्चा निघाल्यामुळे आता राज्यात यापुढे हिंदूंच्या आडावे कोणी येणार नाहीत असा इशाराही नितेश राणे यांनी विरोधकांना दिला आहे.

हिंदूंच्या विरोधात ज्यांनी इतिहास घडविला त्यांना मोठं करण्याचं काम मविआने केलं; भाजप नेत्याने मविआला हिंदूविरोधी ठरवलं
Follow us on

मुंबईः लव्ह जिहादला विरोध दर्शविण्यासाठी आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यासाठी सकल हिंदू समाजाने विरोट मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे निमित्ताने शिंदे गट, भाजपने महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार हल्लाबोल चढविला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हिंदू समाजाच्या विराट मोर्चा का काढला गेला आहे. त्याची माहिती सांगत महाविकास आघाडीच्या काळात हिंदूंची संख्या कमी करण्यासाठी जे जे प्रयत्न केले पाहिजे होते, ते प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आले नाहीत.

तर हिंदूविरोधी काम करणाऱ्या अतिरेक्यांना मोठं करण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारने केले असल्याची टीकाही नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

राज्यात मागील अडीच वर्षात असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने हिंदूचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीमुळेच राज्यात हिंदू समाजातील लोकांची संख्या कमी झाली आहे.

तर राज्यात टिपू सुलतानासारख्या मानसिकता असलेल्या लोकांची, अतिरेकी मेननसारख्या लोकांच्या अतिरेक्यांना मोठं करण्याचं काम या ठाकरे सरकारने केले असल्याची टीका नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

राज्यात असलेली हिंदूंची संख्या कशी कमी होईल आणि आपल्या सणासुदीवर टाच आणण्याचा प्रयत्नही या महाविकास आघाडीच्या सरकारने केला आहे.

तर दुसरीकडे अतिरेकी संघटनेते काम करणाऱ्या अतिरेकी मेननसारख्या लोकांनाही मोठं करण्याचं का या सरकारने केले होते. त्यामुळे या हिंदू समाजाच्या या विराट मोर्चाद्वारे उत्तर मिळाले आहे असा टोला त्यांनी मविआच्या नेत्यांना त्यांनी लगावला आहे.

हिंदू मराठा मोर्चा निघाल्यामुळे आता राज्यात यापुढे हिंदूंच्या आडावे कोणी येणार नाहीत असा इशाराही नितेश राणे यांनी विरोधकांना दिला आहे.

तर नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला हिंदूविरोधा ठरवलेले असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र अजूनही हिंदूना शेवटचं आशास्थान म्हणजे शिवसेना भवन वाटते हेच खूप महत्वाचे असल्याचे राऊत यांनी सांगितले.