‘धर्मवीर’वरून ‘धरणवीर’ शब्दाची ‘या’ नेत्यानी केली पुनरावृत्ती; ‘त्या’ वक्तव्यावरून ठाकरे गटाचीही लाज काढली…

| Updated on: Jan 03, 2023 | 10:45 PM

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अजित पवार यांनी पुन्हा बोलताना विचार करून तरी बोलले पाहिजे. आणि जर पुन्हा आशी हिम्मत केली तर आता पुतळाच जाळला आहे.

धर्मवीरवरून धरणवीर शब्दाची या नेत्यानी केली पुनरावृत्ती; त्या वक्तव्यावरून ठाकरे गटाचीही लाज काढली...
Follow us on

मुंबईः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असं मत व्यक्त केले होते. त्यावरून भाजपने आक्रमक होत संभाजी महाराज यांच्या सन्मानार्थ मोर्चा काढला होता. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या निषेध म्हणून कडेलोट आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार यांनी संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केल्यानंतर नितेश राणे यांनी अजित पवार यांनी ही अक्कल कोणी दिली असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

तर दुसरीकडे अजित पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वराज्यरक्षक हे बिरुदावली मोठी असल्याचे सांगत अजित पवार यांच्या वक्तव्याचे समर्थन केले होते.

त्यामुळे अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका करत अमोल कोल्हे यांना हे डोकं कुणी दिले म्हणते ते पैसे घेऊन स्कीप्ट लिहून दिल्यावरच ते बोलतात अशी टीका ही नितेश राणे यांनी त्यांच्यावर केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धर्मवीर नव्हे ते स्वराज्यरक्षक होते असे वक्तव्य करून त्यांनी महाराष्ट्राच्या भावनेचा अनादर केला आहे. संपूर्ण महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणूनच ओळखतो त्यामुळे अजित पवार यांनी राज्याच्या भावनेचा विचार केला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितली.

कडेलोट आंदोलन, अजित पवार यांनी धर्मवीर वक्तव्यावरून कडेलोट आंदोलन, अजित पवार यांना अक्कल कोणी दिली, खासदार अमोल कोल्हे यांना डोकं कुणी दिली, पैसे घेऊन आणि स्कीप्ट घेऊन अमोल कोल्हे बोलतो ते सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात, हे अजित पवार यांना समजलं पाहिजे, छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीरच बोलायचं आहे ही उभा महाराष्ट्राची भावना आहे.,

छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अजित पवार यांनी पुन्हा बोलताना विचार करून तरी बोलले पाहिजे. आणि जर पुन्हा आशी हिम्मत केली तर आता पुतळाच जाळला आहे.

भविष्यात शिवप्रेमी कोणत्या टोकावर जातील याचा अंदाज अजित पवार यांनी लक्षात घ्यावा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला याहे. त्यामुळे धरणवीर यांनी पु्न्हा चुकीची माहिती देऊ नये नाही तर महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी फिरायला देणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला आहे.