मुंबईः “माझ्या आवडीचा सरपंच जर नाही निवडून नाही आला तर निधी देणार नाही” असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी कणकवली ग्रामपंचायत निडणुकीच्या प्रचारावेली केले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महेश तापसे यांनी नितेश राणे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करत निवडणूक आयोगानेच त्यांच्यावर कारवाई करून, त्यांच्या गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे सध्या कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, यावेळी सगळा निधी माझ्या हातात आहे.
जर माझ्या विचाराचा कुणीही सरपंच झाला नाही तर एक रुपयाचाही निधी मी त्या गावाला देणार नाही असा थेट इशाराच त्यांनी जाहीर सभेत दिला आहे.
मी सत्तेत असलेला भाजपचा आमदार आहे, त्यामुळे मला विचारल्याशिवाय या गावांना निधी मिळणार नाही असा इशारा देत निधी देण्यावरून आणि थांबवण्यावरून ग्रामपंचायतीने थेट धमकी देण्यात आली आहे.
या प्रकरणावरच राष्ट्रवादी काँग्रेसने अक्षेप घेत नितेश राणे यांच्या वक्तव्याची नोंद निवडणूक आयोगाने घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या या वक्तव्यामुळे लोकशाहीची हत्या होत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. त्यामुळे या प्रकरणाची निवडणूक आयोगानी दखल घेणार की नाही याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तर विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
नितेश राणे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात प्रचंड गदारोळ माजला आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. निवडणूक आयोगानीही त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.