मुंबईः भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी डोंबिवलीत आयोजित केलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी कब्बडी चषक 2023 या स्पर्धेला भाजप आमदार आणि माजी विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांची उपस्थिती होती. यावेळी प्रवीण दरेकर यांनी पवार कुटुंबीयांवर जोरदार टीका करत देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आकास असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली. कारण या महाराष्ट्रामध्ये पवारांशिवाय दुसरा कोणी मोठा नेता नाही, अशा प्रकारचा त्यांचा एक समज होता.
मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी अडीच वर्षात राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवून लावत, जनतेच्या मनातलं सरकार आणले आहे.
त्यामुळे स्वाभाविक पवार कुटुंबीयांच्या मनामनात द्वेष भरलेला आहे. त्याच प्रचिती वारंवार पवार कुटुंबीयांतील सदस्यांकडून होणाऱ्या टीकेतून दिसून येते. फडणवीस यांच्याशिवाय टीका करायला आता राज्यात नेतृत्व कुठे आहे.
म्हणून अशा प्रकारे आकसाने केलेली टीका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पलीकडे या टीकेला काही महत्व नाही असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आता राज्यात विस्तार झाला आहे. सरकार लोकांसाठी काम करत आहे.
प्रश्न आमच्या संतोष, असंतोषाचा नाही आहे. तर राज्यातील जनतेला विकासावर प्रगती हवी आहे आणि आज तो पूर्ण विश्वास शिंदे व फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी राज्यातील जनतेला मिळतो आहे असा टोलाही त्यांनी पवार यांना लगावला आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आम्हा आमदारांना काय मिळतं हे महत्त्वाचं नाही. तर सगळे आमदार संतुष्ट आहेत.
या सरकारच्या माध्यमातून लोकांचे कामं होत आहेत. त्यांना आनंद मिळतो आहे आणि आणखीन काम होतील. आणि त्यामुळे आमचे नेते मंत्रीपदासाठी संतुष्ट-असंतुष्ट असण्याची काही देणं घेणं नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
सर्व एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची टीम एकजीनसाने काम करत आहे. तर महाराष्ट्राच्या विकासासाठीही ती काम करत आहे आणि इथून पुढंही ती काम करत राहिल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.