मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाकडून 2 वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. हे सुरू असतानाच आता भाजपकडून पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे ओबीसी समाज त्यांना तसा धडा शिकवणारच आहेत मात्र, भाजपकडून आता राज्यभर राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर गंभीर आरोप करताना त्यांनी काँग्रेसवर जातीयवादाचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे भाजपकडून आता राज्याभर आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी एका विशिष्ट समाजाचा अपमान केला आहे.
त्यामुळे भाजपकडून आंदोलनाची तयारी करण्यात आली आहे. राहुल गांधी यांना आता जामीन मिळाला असला तरी आणि ते सुप्रीम कोर्टात गेले तरी त्यांना जेल ही होणारच असल्याचा टोलाही त्यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.
काँग्रेसकडून ज्या प्रकारे जातीयवाद रुजवला गेला आहे, तो जातीयवाद भाजपकडून ठेचून काढणार असल्याचा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान झाला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे.
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला असल्यामुळे त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात तेली समाजाकडून निषेधही व्यक्त केला जात आहे.