मुंबईः मागील दोन दिवसांपासून पहाटेच्या वेळी झालेल्या शपथ विधीवरून राजकारण तापले आहे. एकीकडे या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यानंतर शरद पवार यांनीही पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवटी उठली असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून राजकारण तापले आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या नेत्यानी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
पहाटेच्या शपथविधीवरून आता राजकारण तापलेले असतानाच आणि देवेंद्र फडणवीस यांनी या शपथविधीला शरद पवार यांना कारणीभूत ठरवले होते.
त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावरून त्यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
पहाटेच्या शपथ विधीची सर्व माहिती ही शरद पवार यांनी माहिती होती अशी टीका करण्यात आली होती. हा शपथ विधी शरद पवार यांनी माहिती असली तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री न होऊ देण्याकरितात त्यांनी हे केलं आहे तेच आज शरद पवार यांनी मान्य केलं आहे अशी टीकाही बावनकुळे यांनी केली आहे.
शिवसेना आणि भाजपची युती तोडण्यासाठीच शरद पवार यांनी हा राजकारण केले होते. पहाटेच्या शपथ झाल्यानंतर राज्यात जे राजकारण झाले आहे.
त्यालाही शरद पवारच जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली आहे. त्यातच शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची भीती वाटत होती म्हणून शरद पवार यांनी पुढचं राजकारण केलं असल्याचेही त्यांनी सांगितले.
शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची भीती वाटत होती, त्याचमुळे त्यांनी पहाटेच्या शपथविधी नंतर राज्यात वेगळे राजकारण घडवल्याचाही ठपका त्यांनी त्यांच्यावर ठेवला आहे.
शरद पवार यांना वाटत होते की, जर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादी पुन्हा 15 वर्षे सत्तेत येणार नाही याचीही भीती त्यांना वाटत होती असा टोलाही त्यांनी शरद पवार यांना लगावला आहे.
शरद पवार यांना शिवसेना भाजपची युती पटली नसल्यामुळे त्यांनी आमची युती तोडण्याची काम शरद पवार यांनी केलं आहे. त्यांनी पक्ष तोडण्याचे काम केले कारण त्यांचा पक्ष कधी 100 च्यावरही गेला नाही.
त्यांच्या पक्षाचे 75 च्या खालीचं ती संख्या राहिली आहे त्यामुळे त्यांनी पक्ष तोडण्याचं काम केलं असल्याचा आरोप त्यांनी त्यांच्यावर केला आहे. महाविकास आघाडीचा त्यांनी राजकीय प्रयोग असला तरी शरद पवार यांच्यामुळेच शिवसेना उद्धवस्त झाली असल्याचा ठपकाही त्यांनी त्यांच्यावर ठेवला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी कसब्याच्या निवडणुकीतही आमचाच विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.