गोविंद ठाकूर, ठाणे : जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे पाकिस्तानची भाषा करतात. रामनवमी आणि हनुमान जयंतीत शोभा यात्रा भारतात नाही काढायची तर काय पाकिस्तानात काढायची का, असा सवाल भाजपने केलाय. या सणांतील शोभायात्रेवरून आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा त्यांना अटक करा, या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात लवकरात लवकर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे.. जर हिंदू धर्माचा त्यांनी सातत्याने अपमान सुरुच ठेवला तर तर जितेंद्र आव्हाड जितेंद्र जिथे दिसतील त्यांचे चप्पलेने स्वागत केले पाहिजे, असं वक्तव्य भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी केलंय. मुंबईत आज त्यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली.
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंबईतील अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी तक्रार दाखल केली. जितेंद्र आव्हाड हे पाकिस्तानची भाषा बोलतात, रामनवमी आणि हनुमान जयंतीत शोभा यात्रा हिंदुस्थानमध्ये नाही काढली तर पाकिस्तानमध्ये साजरी करावी का….? असा सवाल तिवाना यांनी केलाय.
जितेंद्र आव्हाड यांनी फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वातील हिंदु-देवी देवतांचा अपमान केला आहे. सर्वच हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सर्व हिंदुंनी येऊन येथे निवेदन सादर केलंय. ही एक घटना नाहीये, जितेंद्र आव्हाड यांनी सातत्याने हिंदु धर्मियांचा अपमान केलाय. त्यांच्याविरोधात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात जितेंद्र आव्हाड म्हणाले, रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या शोभा यात्रेत दंगे होतात. ती यात्रा भारतात निघणार नाही तर मग पाकिस्तानात निघणार का? जितेंद्र आव्हाड पाकिस्तानची, मुघलांची भाषा बोलत आहेत, त्यामुळे हे कदापि सहन होणार नाही, असा इशारा तिवाना यांनी दिलाय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घाटकोपरमध्ये काल सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात त्यामध्ये दंगली होतात असे विधान केले होते. या वक्तव्याविरोधात भाजप मुंबईमध्ये आक्रमक झाली आहे. तर नवी मुंबईत खारघर येथील कार्यक्रमातही उष्माघाताने मृत्यू पावलेल्या नागरिकांवरून जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
सरकारने नागरिकांनी एककिडे उन्हात जाऊ नये असं आवाहन केलं तर दुसरीकडे लाखो नागरिकांना उन्हात तडफडत कार्यक्रमात बसण्यासाठी भाग पाडलं. पाण्याची व्यवस्थादेखील केली नाही. डोक्यावर कोणतेही छत नाही. मुंबईत आर्द्रता असल्याने डिहायड्रेशनचे प्रकार दिसत होते. मात्र स्वतः व्यासपीठावर एसीच्या बाजूला बसले होते आणि नागरिकांना वाऱ्यावर सोडले, असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केलाय..