मुंबईतील बीकेसीमधील अंडरग्राऊंड मेट्रोला भीषण आग; प्रवाशांमध्ये गोंधळ

| Updated on: Nov 15, 2024 | 3:53 PM

Mumbai BKC Metro Fire : मुंबईतील वांद्रे कुर्ला मेट्रो स्थानकात आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे ते आरे कॉलनी हा पहिला टप्पा नुकताच सुरु करण्यात आला होता. त्यातच आता अंडरग्राऊंड असलेल्या बीकेसीमधील मेट्रो स्टेशनला आग लागली आहे. यामुळे आगीमुळे सर्वत्र धुळाचे लोळ उठल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या ही मेट्रो सेवा ही थांबवण्यात आली […]

मुंबईतील बीकेसीमधील अंडरग्राऊंड मेट्रोला भीषण आग; प्रवाशांमध्ये गोंधळ
Follow us on

Mumbai BKC Metro Fire : मुंबईतील वांद्रे कुर्ला मेट्रो स्थानकात आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे ते आरे कॉलनी हा पहिला टप्पा नुकताच सुरु करण्यात आला होता. त्यातच आता अंडरग्राऊंड असलेल्या बीकेसीमधील मेट्रो स्टेशनला आग लागली आहे. यामुळे आगीमुळे सर्वत्र धुळाचे लोळ उठल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या ही मेट्रो सेवा ही थांबवण्यात आली आहे. सध्या ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये एका मेट्रो स्टेशनचे काम सुरू आहे. या परिसरात आज दुपारी 1 वाजून 9 मिनिटांच्या सुमारास आग लागली. या भूमिगत मेट्रो स्थानकातील तळघरात ठेवलेले लाकडी साहित्य आणि फर्निचर यांना ही आग लागली. यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ पसरले आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

सर्व प्रवासी सुखरुप

सध्या ही आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वांद्र्यात सध्या घटनास्थळी अग्निशमक दलाच्या गाड्या आणि स्थानिक पोलिसांची टीम कार्यरत आहे. सध्या अडकलेल्या प्रवाशांना अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमधून बाहेर काढण्यात आले आहे.

आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे कुर्ला संकुलात लागलेली आग ही लेव्हल २ ची आग आहे. यामुळे बीकेसीमधील आत आणि बाहेर जाण्याचा परिसर बंद करण्यात आला आहे. तसेच सध्या ही मेट्रो सेवा ही थांबवण्यात आली आहे. सगळे प्रवासी सुखरुप असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मेट्रोनं दिली आहे. तात्पुरत्या स्वरुपात बांद्रा कॉलनी स्टेशनवरुन ग्राहकांना मेट्रो पकडण्याची मुभा देण्यात आली आहे.