मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी (BMC Additional Commissioner Suresh Kakani) आज कोव्हिड लस घेतली. लोकल सुरु झाल्यानंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली नाही. मात्र, 31 मार्चपर्यंत आम्ही निरीक्षण करु. जम्बो सेंटर देखील 31 मार्चपर्यंत सुरुच ठेवणार त्यानंतर आम्ही बंद करण्यासंदर्भात विचार करु. आजपासून कोव्हीड लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. धोकादायक रुग्णालयांना आम्ही त्रुटी दूर करण्यासंदर्भात वेळ देवू अन्यथा कठोर कारवाई करु, असं यावेळी सुरेश काकाणी यांनी सांगितलं (BMC Additional Commissioner Suresh Kakani).
“कोव्हिडच्या युद्धात आपण सगळे सहभागी होतो. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्याला आपण सुरुवात केली. फ्रंटलाईन वर्करला सुरुवात केली. 3 लाख 60 हजार वर्कर्स फ्रंटलाईन आणि हेल्थकेरचे मिळून कर्मचारी आहेत. 21 सेंटरमध्ये लसीकरण करण्यात येत. लसीकरणासाठी 114 युनिट कार्यकरत आहेत. लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु आहे आणि आता दुसरा टप्पा सोबतच सुरु करतोय”, अशी माहिती त्यांनी दिली.
“हेल्थकेर बऱ्या प्रमाणात कव्हर झाले आहेत. दुसऱ्यात फ्रंटलाईन कव्हर एक महिन्यात करायचा आहे. मुंबईत कोणतीही तक्रार लशी संदर्भात नाही. महाराष्ट्रात अजून दुष्परिणाम नाहीत. 2 लाख 65 हजार लशींचा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. आणखीही साठा केंद्र सरकार आपल्या देणार आहे. लशींची उपलब्धता आहे”, असंही त्यांनी सांगितलं.
“लोकल सुरु झाल्यानंतर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. आणखी 15 दिवस सतर्क राहणार आहोत. 31 तारखेपर्यंत सेंटर सुरु ठेवले आहेत. अद्याप संख्येत अधिकवाढ झालेली नाही, सगळ्यांनी काळजी घ्यावी. लोकल सर्वांना पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासंदर्भात सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. टप्या टप्याने लोकल सुरु करणार आहोत.”
“15 दिवसांपूर्वी आढावा घेतलाय. लोकल सुरु झाल्यात. सगळ्या गोष्टींचा विचार करुन अजूनशाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. MMR परिसराचा विचार करुन निर्णय घेऊ. दर आठवड्याला आढावा घेतोय, एक एक क्षेत्र हळू हळू सुरू करतोय”, असंही ते म्हणाले.
“लहान मुलांच्या लसीकरणाबाबत एका रुग्णालयात चाचण्या आपण करतोय. जन्माला आलेल्या नवजातशिशूच्या प्रतिजैविका बाबत तपासण्या केल्या जातायत. लसीकरण 18 वर्षांवरील लोकांनाचं द्यायचं आहे.”
“प्रक्रिया सुरु केलीय. कालावधी देणार आहोत. धोकादायक अवस्था दुरुस्त केली नाही तर नियमांनुसार कडक कारवाई करणार आहोत. 31 मार्चपर्यंत सज्जता कायम ठेवणार आहोत. रुग्ण संख्या वाढल्या नाहीत, तर कोव्हिड सेंटरसाठी घेतलेल्या त्या-त्या आस्थापनांना इमारती परत करण्याचा निर्णय घेऊ. लोकल सर्वसामान्यांना सुरू करण्याबाबत आणि शाळा सुरु करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. आम्ही दर आठवड्याला बैठक घेऊन आढावा घेतोय. सकारात्मकता दिसल्यास निर्णय घेऊ. तिसऱ्या टप्यात पत्रकारांना पहिल्या भागात लस देण्याचा प्रयत्न असेल”, अशीही माहिती त्यांनी दिली.
Corona | भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने उतार कसा झाला? वैज्ञानिकांनाही पडलाय प्रश्न..#coronavirusinindia | #Corona | #health https://t.co/tMyTFU4Rqj
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021
BMC Additional Commissioner Suresh Kakani
संबंधित बातम्या :
कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये समोर आलं धक्कादायक लक्षण, नाशिकमध्ये खळबळ
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्रच सरस; मृत्यूदर आणि सक्रीय रुग्णांची संख्या कमी