मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सार्वजनिक ठिकाणी फिरताना फेस मास्क लावण्याचे (Additional Municipal Commissioner (City) Sanjeev Jaiswal), सोशल डिस्टनसिंगचे आवाहन करण्यात येते. मास्क लावला नाही, तर दंडात्मक कारवाईही करण्यात येते. मात्र, ही कारवाई करणाऱ्या महापालिका प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी असलेले आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांनी मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी पाहणी दौरा केला. यामुळे कोरोना संदर्भातील नियम फक्त नागरिकांसाठीच आहेत का? पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना मास्क न लावता फिरण्याची परवानगी आहे का?, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे (Additional Municipal Commissioner (City) Sanjeev Jaiswal).
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे करण्यात आलेल्या तयारीसह थेट प्रक्षेपण व्यवस्थेची अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल आणि सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी काल गुरुवारी (3 डिसेंबर) पाहणी केली.
अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पालिका उपायुक्त (परिमंडळ 2) विजय बालमवार, प्रसारभारतीचे डॉ. अश्विनी कुमार, पोलीस उपायुक्त प्रणय अशोक, पालिका माहिती तंत्रज्ञान खात्याचे संचालक तथा सहाय्यक आयुक्त शरद उघडे, जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी संजीव जयस्वाल वगळता सर्व अधिकाऱ्यांनी मास्क लावून राज्य सरकार आणि पालिकेच्या नियमांचे पालन केल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी जयस्वाल यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात करुन आल्यावर महापौरांनी दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या भोजनाच्या कार्यक्रमात जयस्वाल यांना मास्क न लावता वावरताना उपस्थितांनी पाहिले होते. त्यानंतर आता जयस्वाल यांना मास्क न लावता गर्दीमध्ये चैत्यभूमीवरील तयारीची पाहणी करताना नागरिकांनी पाहिले (Additional Municipal Commissioner (City) Sanjeev Jaiswal).
मास्क लावला नाही, तर नागरिकांकडून दंड वसूल केला जात असताना पालिकेचे कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी मात्र मास्क लावत नसल्याने या अधिकाऱ्यांवर दंडात्मक आणि साथ नियंत्रण कायद्यानुसार कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न मुंबईकरांकडून विचारला जात आहे.
विनामास्क मुंबईकरांना दंड बजावल्यावर ‘मोफत’ मास्कही मिळणार https://t.co/N8XYQicXWN
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 29, 2020
Additional Municipal Commissioner (City) Sanjeev Jaiswal
संबंधित बातम्या :
कोरोनाची लस आल्यानंतरही खबरदारी घ्या, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर गरजेचाच- ICMR
नागपूर महापालिकेची गांधीगिरी, मास्क न वापरणाऱ्यांसाठी अशी आहे शिक्षा