मुंबई : मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक अशा मुख्यालयात लावण्यात आलेले सीसीटीव्ही बंद पडले आहेत. हे सीसीटीव्ही बंद पडल्याने पालिका मुख्यालयाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. पालिका मुख्यालयाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. हे नव्याने सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर केला आहे. यासाठी मुंबई महापालिका 77 लाख रुपये खर्च करणार आहे. (BMC CCTV Not In Working Condition 77 lakh Rs New Proposal)
भारतावर इंग्रजांचे राज्य असताना मुंबई महापालिका मुख्यालयाची इमारत बांधण्यात आले आहे. या इमारतीला ऐतिहासिक असे महत्त्व आहे. या इमारतीत महापौर, आयुक्त, विविध समित्यांचे अध्यक्ष, पक्षांची कार्यालये असल्याने या इमारतीत अनेक बड्या नेत्यांची लोकांची ये-जा असते.
मुंबईवर पाकिस्तानी आतंकवादी कसाबने हल्ला केला. तेव्हा पालिकेचा एक सुरक्षारक्षक जखमी झाला होता. मुंबई महापालिका मुख्यालय नेहमीच हिट लिस्टवर राहिले आहे. अशा या मुख्यालयात सुरक्षेच्या कारणासाठी 2016 मध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही बंद पडले आहेत.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात लावण्यात आलेले सीसीटीव्ही बंद पडले आहेत. याचे कंत्राटही संपले आहे. यामुळे या सीसीटीव्हीची देखभाल कंत्राटदाराने बंद केली आहे.
पालिका मुख्यालय हिट लिस्टवर असल्याने पालिका मुख्यालयात नव्याने 84 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासाठी कंत्राटदाराला नव्याने कंत्राट देण्यात येणार आहे. यासाठी 77 लाख 55 हजार 514 रुपये खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव उद्या बुधवारी स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. (BMC CCTV Not In Working Condition 77 lakh Rs New Proposal)
संबंधित बातम्या :
दिलासादायक! मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढला, अडीचशेचा टप्पा पार
पाणीपट्टी वसूलीसाठी पालिकेची अभय योजना, 138 कोटी रुपये तिजोरीत जमा