मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मिठी नदीसह मोठ्या नाल्यांची साफसफाई केली जाते. येत्या पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाई कामांना यंदा फेब्रुवारी अखेर सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी 152.25 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. या संबंधित स्थायी समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान मंजुरी दिली आहे. (BMC Cleaning large nallas before monsoon)
मुंबई महापालिका क्षेत्रात पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने व्हावा, यासाठी मुंबई महानगरपालिका विविध स्तरीय उपाययोजना सातत्याने अंमलात आणत असते. याच अंतर्गत महापालिका क्षेत्रातील मिठी नदीसह मोठ्या नाल्यांची साफसफाई महापालिकेद्वारे नियमितपणे करण्यात येत असते. मोठ्या नाल्यांची साफसफाई करताना साधारणपणे पावसाळ्यापूर्वी 75 टक्के, पावसाळ्यादरम्यान 15 टक्के आणि पावसाळ्यानंतर 10 टक्के याप्रमाणे कामे केली जातात.
महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिका क्षेत्रातील शहर भागात अंदाजे 32 कि. मी. लांबीचे मोठे नाले आहेत. यांच्या साफसफाईसाठी रुपये 12.19 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
तर पूर्व उपनगर भागात असणाऱ्या मोठ्या नाल्यांची सुमारे 1oo कि.मी असून यांच्या साफसफाईसाठी रुपये 21.03 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. पश्चिम उपनगरांमध्ये असणाऱ्या सुमारे 140 कि. मी. लांबीच्या मोठ्या नाल्यांच्या साफसफाईकरिता रुपये 29.37 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे.
तसेच शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर या तिन्ही भागातून वाहणाऱ्या सुमारे 20 कि.मी. लांबीच्या मिठी नदीच्या सफाई कामांबाबत मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी रुपये 89.66 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. मिठी नदीची साफसफाई करताना गाळाच्या एकूण परिमाणाच्या 80 टक्के साफसफाई ही पावसाळ्यापूर्वी करण्यात येते. तर उर्वरित 20 टक्के साफसफाई ही पावसाळ्यानंतर करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याद्वारे देण्यात आली आहे. (BMC Cleaning large nallas before monsoon)
संबंधित बातम्या :
कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसे आमदार राजू पाटलांच्या नेतृत्वात लढणार
समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार करणार; मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय