मुंबई : मुंबई महापालिकेत प्रभारी निवडणुकीवरुन सुरु झालेला सत्ताधारी विरुद्ध आयुक्त वाद अखेर मिटला आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी अखेर महापौर किशोरी पेडणेकर तसेच सभागृह नेत्यांची माफी मागितली आहे. “मला लहान भाऊ समजून माफ करा,” असे इक्बालसिंह चहल यांनी महापौर पेडणेकर यांना सांगितले. (BMC Commissioner Apologies to Mumbai Mayor)
मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुका आयोजित केल्या होत्या. मात्र या निवडणूक कामकाजासाठी सहाय्यक आयुक्तांसह अधिकारीही गैरहजर राहिले. त्यावरुन महापौरांनी आक्रमक पावित्रा धारण करत दालनातच ठिय्या आंदोलन केले होते. याप्रकरणी महापौरांनी आयुक्तांनी फोनवर उद्धटपणे उत्तर दिल्याचा आरोपही केला होता.
याप्रकरणी वाद वाढत असतानाच आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महापौर आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना फोन केला. मला लहान भाऊ समजून माफ करा, असे चहल महापौरांना म्हणाले. यानंतर महापौरांनीही लहान भावानंही यापुढे मोठ्या बहिणीचं ऐकावं, अस सांगत या वादावर पडदा टाकला.
“मुंबई महापालिकेत प्रशासकीय अधिकारी महापौर यांचा अपमान केला हे योग्य नाही. आता सत्ताधारी, विकलांग, महापौर हतबल आणि प्रशासन उद्दाम झाले आहेत हे आता मुंबईकरांसमोर गेले आहेत. आता आयुक्त माफी मागत असले तरी जे जायचं होतं ते मुंबईकरासमोर गेलं आहे,” असे भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुका आज (14 ऑक्टोबर) पार पडणार होत्या. सकाळी 10 वाजता ही निवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी महापौर आणि नगरसेवक सकाळी 9.30 पासून हजर होते.
पण या निवडणूक कामकाजासाठी सहाय्यक आयुक्तांसह अधिकारी गैरहजर राहिले. तर चिटणीस विभागातील दोनच कर्मचारी उपस्थित होते. बाकी कर्मचारी गैरहजर होते. तसेच जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तही गैहरजर राहिले. संबंधित वरिष्ठ अधिकारी हजर नसल्याने महापौर आक्रमक झाल्या.
कर्मचारी गैरहजर राहिल्याने निवडणुका घ्यायच्या कशा? असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. पालिकेचे अधिकारी वेळेचे बंधन पाळत नाही याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावं. यासाठी महापौर किशोरी पेडणेकरांनी ठिय्या आंदोलन केलं. (BMC Commissioner Apologies to Mumbai Mayor)
संबंधित बातम्या :
मुंबईच्या महापौरांचा दालनातच ठिय्या, प्रभाग समित्यांच्या निवडणुकासांठी कर्मचारी गैरहजर