मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना हटवण्यात (BMC commissioner Praveen Pardeshi transferred) आलं आहे. ठाकरे सरकारने मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली केली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आवरत नसल्याने ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे. प्रवीण परदेशी यांना नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी यांच्या जागी इक्बाल चहल हे मुंबई मनपाचे नवे आयुक्त असतील. (BMC commissioner Praveen Pardeshi transferred)
मुंबई महापालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्तांनाही हटवण्यात आलं आहे. मुंबई मनपातील अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाडांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे मनपाचे माजी आयुक्त संजीव जैस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानेच प्रवीण परदेशी यांना हटवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. प्रविण परदेशी यांच्या अनेक निर्णय देखील वादात सापडले होते. त्यांच्या या निर्णयांबद्दल अनेक मंत्र्यांनी तक्रारीही केल्या होत्या. त्यांच्यावर परस्पर निर्णय घेतल्याचाही आरोप होत होता.
प्रविण परदेशी यांनी मे 2019 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. याआधी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिलं आहे. परदेशी यांनी आपल्या 29 वर्षांच्या कार्यकाळात लातूर आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिलं आहे.
कोण आहेत प्रवीण परदेशी?
कोण आहेत इक्बाल चहल?
प्रवीण परदेशींना बळीचा बकरा बनवला : सोमय्या
किरिट सोमय्या म्हणाले, “प्रविण परदेशी यांनी केवळ बळीचा बकरा बनवला आहे. मागील 23 वर्षे मुंबई महानगरपालिकेत ठाकरे परिवाराचं राज्य आहे. आता ठाकरे परिवारातील व्यक्ती मुख्यमंत्री आहेत. ठाकरे परिवारीतील एक व्यक्ती मुंबईचे पालकमंत्री आहेत. मागील 50 दिवसांची कोरोनाची लढाई सुरु आहे. मग ती काय केवळ प्रशासन चालवत होतं का? मग राजकीय नेतृत्त्व काय करत होतं? मुख्यमंत्री घरातून बाहेर पडू शकत नाही. त्यांची हिंमत नाही का तेवढी?”
विरोधी पक्षनेत्यांचं टीकास्त्र
आपली जबाबदारी झटकण्यासाठी आयुंक्ताची बदली हा मार्ग नाही! अधिकाऱ्यांची अदलाबदल करण्याऐवजी उपाययोजना सशक्त आणि गतिमान करण्याची आवश्यकता आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.