BMC Corona Guidelines: रुग्ण आढळल्यास घरे सील, नियम मोडल्यास सोसायटीला तगडा दंड, मुंबईत कडक नियम

| Updated on: Apr 06, 2021 | 6:45 PM

मुंबई मबहापालिकेने कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्याचे पालन करण्याचं आवाहन पालिकेने केले आहे. BMC strict rules imposed societies

BMC Corona Guidelines: रुग्ण आढळल्यास घरे सील, नियम मोडल्यास सोसायटीला तगडा दंड, मुंबईत कडक नियम
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही, वाचा पालिका आयुक्तांचे निर्देश
Follow us on

मुंबई: मुंबई महापालिका प्रशासनाच्यावतीनं कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी महत्वपूर्ण गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. पालिकेने चौपाट्या, ॲन्टिजेन टेस्टींग, मायक्रो कंटेंटमेंट झोन, आणि कोविड टेस्टींगबाबत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये चौपाट्या 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. खाजगी दवाखाने आणि हॉस्पिटलमध्ये येणा-या लक्षणे नसणा-या रुग्णांची ॲन्टिजेन चाचणी करता येणार नाही लक्षणे असलेल्या रुग्णांची ॲन्टिजेन चाचणी करुन त्याचा रिपोर्ट आयसीएमआर गाईडलाईनप्रमाणे प्रशासनास कळवावा लागेल. लक्षणे असलेला रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास आणि हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध असल्यास तेथेच ॲडमिट होईल आणि बेड नसल्यास वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून नजीकच्या केंद्रात त्याला दाखल केले जाईल. (BMC declared guidelines to prevent outbreak of Corona virus in Mumbai strict rules imposed on societies )

मायक्रो कंटेंटमेंट झोन आणि सोसायट्यांना तगडा दंड

5 किंवा 5 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या मुंबईतील इमारती आता मायक्रो कंटेंटमेंट झोन म्हणून ओळखल्या जातील. अशा इमारतीबाहेर मायक्रो कंटेंटमेंट झोनचा बोर्ड लावाला जाईल. मायक्रो कंटेंटमेंट झोनमधील सर्व निर्बंध आणि नियम पाळले जाण्याची जबाबदारी सोसायटीवर राहील. नियम मोडल्यास पहिल्या खेपेस सोसायटीस 10 हजार आणि वारंवार नंतर प्रत्येकवेळी जेव्हा जेव्हा नियम मोडले जातील तेव्हा 20 हजार दंड आकारला जाईल. मायक्रो कंटेंटमेंट झोनच्या इमारतीसमोर एक पोलीस कर्मचारी नेमला जाईल.

कोरोनाबाधित फिरताना आढळल्यास गुन्हा दाखल करणार

इमारतीत ज्या घरात पेशंट आढळले आहेत ती घरे पूर्णत:सील करणे ही सोसायटीची जबाबदारी राहील. जर सोसायटीकडून कोणतीही ढिलाई आढळल्यास सुरुवातीला 10 हजार आणि नंतर 20 हजार दंड ठोठावला जाईल. सोसायटीतील होम आयसोलेशनमध्ये असलेला पॉझिटिव्ह पेशंट बाहेर फिरतानाआढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. मुंबई मबहापालिकेने कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्याचे पालन करण्याचं आवाहन पालिकेने केले आहे.


संबंधित बातम्या: 

Corona Vaccination : केंद्राकडून महाराष्ट्राचं कौतुक, राज्यात आतापर्यंत 81 लाखापेक्षा अधिक व्यक्तींना लसीचा पहिला डोस

देशातील पहिला प्रयोग मुंबईत, बोगद्यांमधील हवा खेळती राहण्यासाठी अत्याधुनिक ‘सकार्डो नोझल यंत्रणा’

BMC declared guidelines to prevent outbreak of Corona virus in Mumbai strict rules imposed on societies